Tuesday , September 17 2024
Breaking News

LOCAL NEWS

महिलांना सकस आहार, दररोज ध्यान साधना व योगा करणेची गरज : डॉ. सविता कद्दू

तारांगण व आयएमएमार्फत कर्करोग जागृती अभियान बेळगाव : सध्याची दगदगीचे जीवनशैली आणि मानसिक तणाव यामुळे महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे सदृढ शरीरासाठी महिलांनी सकस आहाराचे सेवन, दररोज ध्यान साधना व योगा करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन स्त्री रोगतज्ञ व जिव्हाळा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सविता कद्दू यांनी केले. जागतिक कर्करोग दिनानिमित्त …

Read More »

येळ्ळूर ग्रामपंचायतला तालुका पंचायत अधिकाऱ्यांची भेट

बेळगाव : तालुका पंचायत अधिकारी राजेश धनवाडकर यांनी आज दि. 4 रोजी येळ्ळूर ग्राम पंचायतला भेट देऊन कचरा विस्थापन केंद्र व उद्योग खात्री योजनेमध्ये चाललेल्या कामाची पाहणी करून रोजगार महिला व पुरुषांना फर्स्ट एड किटचे वितरण करण्यात आले. तसेच येळ्ळूरमधील पुढील विकासकामासंदर्भात येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य पीडिओ, …

Read More »

चित्रपटगृहे, स्विमिंग पूल, जिम उद्यापासून पूर्ण क्षमतेने सुरू उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

सावधगिरीच्या उपाययोजना कायम बंगळूर : कोविड-१९ प्रकरणांची सध्याची स्थिती आणि हॉस्पिटलायझेशनचे प्रमाण विचारात घेऊन राज्य सरकारने उद्या (ता. ५) पासून जिम, योग केंद्र, सिनेमा हॉल आणि स्विमिंग पूल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, ओमिक्रॉन प्रकाराच्या प्रसारामुळे तिसरी लाट डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाली, तेव्हा हे …

Read More »

जिल्ह्यात ७७८ “ग्राम वन” केंद्रे, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची गणेशपुर केंद्राला भेट

बेळगाव : महसूल, आरोग्य, अन्न यासह 84 विभागातील सुमारे 800 शासकीय विभागांच्या सेवा देण्यासाठी “ग्राम वन” केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ यांनी ग्राम वन केंद्र चालकांना लोकांना पुरेशा सेवा देण्याच्या सूचना दिल्या आहेत. हिंडलगा ग्रामपंचायत क्षेत्रातील गणेशपुर येथील ‘ग्राम वन’ सेवा केंद्राची जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ यांनी आज शुक्रवारी पाहणी …

Read More »

सीसीआय केआर शेट्टी संघ कुबेर चषकाचा मानकरी

बेळगाव : सीसीआय स्पोर्ट्स क्लब आयोजित दुसऱ्या कुबेर चषक 11 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद सीसीआय केआर शेट्टी संघाने हस्तगत केले आहे. अंतिम सामन्यात शेट्टी संघाने प्रतिस्पर्धी आनंद क्रिकेट अकादमी संघाला 8 गड्यांनी पराभूत केले. कॅम्प येथील युनियन जिमखाना मैदानावर काल गुरुवारी कुबेर चषक स्पर्धेचे उपांत्य फेरीच्या सामन्‍यांसह अंतिम …

Read More »

रमेश जारकीहोळी आणि किरण जाधव यांचा पोर्वोरीममध्ये प्रचारदौरा

भाजप बाजी मारेल असा व्यक्त केलाय किरण जाधव यांनी विश्वास बेळगाव : गोवा विधानसभा पोर्वोरीम संघातून निवडणूक लढविणाऱ्या महसूल, आयटी, कामगार आणि रोजगार, योजना आणि सांख्यिकी खात्याचे माजी मंत्री रोहन अशोक कुंटे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. माजी पालक मंत्री आणि विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी तसेच राज्य भाजप ओबीसी …

Read More »

आक्षेपार्ह सीडी प्रकरण; चौकशी अहवाल सादर करण्यास उच्च न्यायालयाची परवानगी

बंगळूर : माजी मंत्री व गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांच्या आक्षेपार्ह सीडी प्रकरणाचा अंतिम चौकशी अहवाल सादर करण्यास कर्नाटक उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) दंडाधिकारी न्यायालयात अंतिम अहवाल सादर करावा असे न्यायालयने निर्देश दिले आहेत. बंगळुरमधील कब्बन पार्क पोलिस स्थानकामध्ये रमेश जरकीहोळीविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल …

Read More »

तारांगण व आयएमए मार्फत कर्करोग जनजागृती कार्यक्रम उद्या

बेळगाव : उद्या दिनांक 4 फेब्रुवारी २०२२ रोजी जागतिक कर्करोग दिन यानिमित्त तारांगण व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग जनजागृती अभियान कार्यक्रमाच्या अंतर्गत महिलांसाठी प्रख्यात स्त्री रोग तज्ञ व जिव्हाळा फाऊंडेशनच्या संस्थापिका डॉ. सविता कद्दू यांचे व्याख्यान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कर्करोगाचा वाढणारा …

Read More »

“मराठी शाळेचा सर्वांगीण विकास, हा एकच ध्यास”

1991-92 च्या माजी विद्यार्थ्यांचा एक स्तुत्य उपक्रम बेळगाव : उचगाव येथील प्राथमिक मराठी शाळेच्या, 1991-92 च्या, 7 वी च्या माजी विद्यार्थ्यानी आपल्या योगदानातून, या वर्षात एक स्तुत्य उपक्रम सुरू केला. शाळेचा सर्वांगीण विकास या एकाच ध्यासापोटी, एक सुरुवात म्हणून शाळेच्या दोन वर्गांना पुरतील अशी 35 बैठक आसने (डेस्क) विद्यार्थ्यासाठी आणि …

Read More »

गोवावेस येथील व्यापारी संकुल लवकरच जमीनदोस्त होणार

बेळगाव : गोवावेस येथील व्यापारी संकुल पाडण्याचा निर्णय बेळगाव महापालिकेने घेतला आहे. ते संकुल जुने आहे व ते धोकादायक स्थितीत असल्याचे कारण देण्यात आले आहे. यासाठी तेथील गाळेधारकांना महापालिकेने नोटीस पाठवली आहे. दुकानगाळे रिकामे करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. गाळे महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास सांगण्यात आले आहे. महापालिकेच्या या …

Read More »