Monday , September 21 2026
Breaking News

धारवाडजवळ लॉरी – कार भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

Spread the love

 

धारवाड : धारवाडमध्ये राष्ट्रीय महामार्ग 4 वर लॉरी आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला.

हळीयाळ पुलाजवळ हा अपघात झाला असून दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमींपैकी एकाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

35 वर्षीय बिंदू गौडा आणि 36 वर्षीय बापू गौडा यांचा मृत्यू झाला. अन्य मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. मृत व्यक्ती हसन आणि म्हैसूर येथील असल्याची माहिती आहे.

कार हुबळीहून बेळगावच्या दिशेने जात होती. हळीयाळ पुलाजवळ एका लॉरीला धडकल्याने ही दुर्घटना घडली. याप्रकरणी धारवाड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *