Tuesday , September 17 2024
Breaking News

LOCAL NEWS

सरकारी एपीएमसी सचिवांना एपीएमसी व्यापाऱ्यांनी घेरले

बेळगाव : सरकारी एपीएमसीचे सचिव डॉ. कोडीगौड यांना एपीएमसी व्यापारी आणि शेतकऱ्यांनी घेराव घातला. खाजगी एपीएमसी निर्माण करण्यात आल्यासंदर्भात एपीएमसीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव शहरात सरकारी एपीएमसी योग्यरितीने सुरु असूनही शड्डू मारून काही लोकांनी खाजगी एपीएमसी निर्माण केली आहे. याविरोधात शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना घेराव घातला आणि …

Read More »

मंत्रिमंडळ विस्तारावर जाहीरपणे बोलण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार

मंत्रिपदासाठी दबाव वाढला, मुख्यमंत्री सोमवारी दिल्ली दौऱ्यावर बंगळूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी आपल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत जाहीरपणे भाष्य करण्यास नकार दिला. पक्षाच्या आमदारांनी मंत्रिपदासाठी त्यांच्यावर दबाव आणला आहे. विधानसभेचा कार्यकाळ केवळ एक वर्ष शिल्लक असल्याने विनाविलंब मंत्रिमंडळ विस्तार व पुनर्रचना करण्याच्या मागणीने जोर घेतला आहे. बोम्मई यांनी पत्रकारांना …

Read More »

बेळगावातील वडगाव येथे रविवारी एकदिवसीय ओशो ध्यानसाधना शिबिराचे आयोजन

बेळगाव : वडगाव येथील खरोशी हॉल चावडी गल्ली येथे रविवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकदिवसीय ओशो ध्यानधारणा शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शीतल यांनी दिली आहे. या शिबिरात मैसूरच्या कृपा मां शिबिरार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरास संदर्भात अधिक माहिती देताना …

Read More »

सामाजिक कार्यासाठी हातभार

बेळगाव : सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर यांच्या हेल्प फॉर नीडी या प्रकल्पाच्या माध्यमातून शेरी गल्ली येथे राहणारे सुधीर पद्मन्नावर यांनी आपल्या मुलीच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनला मदत देऊ केली आहे. रुग्णांना वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा याकरिता त्यांनी सदर फाउंडेशनला ऑक्सीजन सिलेंडर आणि फ्लो मीटरची मदत केली आहे. त्यामुळे …

Read More »

प्रभाग क्रमांक 33, 34 मधील कूपनलिका आणि पाण्याच्या टाकीचे आमदारांच्या हस्ते पूजन

बेळगाव : वार्ड क्रमांक 33 आणि 34 मध्ये मारण्यात आलेल्या कूपनलिका आणि पाण्याच्या टाकीचे पूजन आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले. या दोन्ही प्रभागातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. या भागातील पाणी समस्या दूर करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी आमदार बेनके यांच्याकडे केली होती. या मागणीची पूर्तता …

Read More »

आरटीपीसीआर सक्ती मागे घेण्याची बेळगाव ट्रेडर्स फोरमतर्फे मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बेळगाव (वार्ता) : व्यापार आणि उद्योग धंद्यांचे नुकसान होऊन जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत असल्यामुळे परराज्यातील प्रवाशांना बेळगावातील प्रवेशासाठी करण्यात आलेली आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्राची सक्ती मागे घेण्यात यावी, अशी मागणी बेळगाव ट्रेडर्स फोरमतर्फे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे करण्यात आली आहे. बेळगाव ट्रेडर्स फोरमचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखालील फोरमच्या शिष्टमंडळाने …

Read More »

दहा रुपयांच्या नाण्याबाबत जनजागृती करा

बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर बेळगाव (वार्ता) : भारतीय रिझर्व बँकेने दहा रुपयांचे नाणे हे अधिकृत चलन म्हणून 2016 साली घोषित केले. मात्र याचा वापर बेळगाव जिल्ह्यातील व्यापारी आणि नागरिकांनी अद्यापही केला नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी जिल्ह्यात दहा रुपयाचे नाणे कोठेच चलनात नसल्याचे निदर्शनास …

Read More »

त्या घटनेविरोधात कुद्रेमनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे!

बेळगाव (वार्ता) : कुद्रेमनी ग्रामपंचायत उपाध्यक्ष विनायक पाटील यांना अवमानकारकरित्या अर्वाच्च शिवीगाळ करण्यात आली. एका महिलेने अर्वाच्च शिवीगाळ केलेली असताना या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. सदर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधींचा दबाव कारणीभूत ठरत आहे. या घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजातर्फे कुद्रेमनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्यात आले …

Read More »

स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

उचगाव : गुरु शिष्याचे नाते हे प्राचीन काळापासून चालत आले आहे. प्रगत तंत्रज्ञानात गुरूंचा आदर व्यक्त करण्यासाठी केलेला हा सोहळा पाहून आम्ही धन्य झालो. शिष्यांच्या जीवनातील अंधकाराचा नाश करून राष्ट्र व धर्म यांच्या रक्षणासाठी गुरु शिष्य नाते हेच सर्वश्रेष्ठ आहे अशा प्रकारचे प्रतिपादन स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या शैक्षणिक वर्ष 130 या …

Read More »

म. ए. समितीच्या शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकार्‍यांसमवेत विविध विषयांवर चर्चा

बेळगाव (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज दुपारी बेळगावचे जिल्हाधिकारी श्री. हिरेमठ यांची भेट घेऊन त्यांच्या बरोबर सीमाभागातील मराठी भाषिक अल्पसंख्याकांचे प्रश्नाबाबत चर्चा केली. कासरगोड जिल्ह्यातील कन्नड भाषिक अल्प संख्याकांचे संदर्भात केरळ सरकारने अल्पसंख्यांक आयोगाला दिलेल्या परिपत्रकाचा संदर्भ देत महाराष्ट्र एकीकरण समितीने गेल्या अनेक वर्षापासून केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. …

Read More »