Sunday , September 20 2026
Breaking News

कोल्हापुरात तणाव; बेळगावात सतर्कतेच्या सूचना

Spread the love

 

बेळगाव : कोल्हापुरात निर्माण झालेल्या तणावाच्या
परिस्थितीवर बेळगाव पोलीस लक्ष ठेवून आहेत. कोल्हापुरातील लोण बेळगावात पसरू नये, यासाठी दक्षता घेतली जात आहे.
शहर पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. मंगळवारी शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे निमित्ताने कोल्हापुरात काही समाजकंटकानी सामाजिक शांतता बिघडवण्यासाठी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट स्टेटस ठेवले होते. त्याचे पडसाद काल कोल्हापुरात उमटले. कोल्हापूर बंदची हाक ही देण्यात आली होती. कोल्हापूर बंदला गालबोट लागले होते. कोल्हापूरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानंतर, या सर्व घडामोडींवर बेळगाव पोलीस देखील बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *