Monday , December 15 2025
Breaking News

LOCAL NEWS

बेळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी सतीश जारकीहोळी तर विजयनगरच्या पालकमंत्रीपदी लक्ष्मी हेब्बाळकर यांची नियुक्‍ती

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अखेर अपेक्षेप्रमाणे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांची नियुक्ती झाली आहे, तर बेळगाव ग्रामीण आमदार आणि महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची विजयनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बेंगलोरहून हा आदेश आज (शनिवार) सकाळी जारी करण्यात आला. सर्व 31 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची घोषणा …

Read More »

कर्नाटकात काँग्रेसने वचन पाळले; १ जुलै पासून २०० युनीट वीज मोफत

  बंगळुरु : कर्नाटक सरकार चालू वर्षात निवडणुकीत काँग्रेसकडून करण्यात आलेल्या पाच महत्त्वाच्या घोषणाची पुर्तता करणार असल्याची हमी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. शुक्रवारी (दि.२) कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या माध्यमांशी बोलताना म्हणाले, आमचे सरकार निवडणुकीत दिलेल्या वचनांचे पालन करेल. त्याचा एक भाग म्हणून कर्नाटकात ‘गृहज्योती’ योजने अंतर्गत १ जुलै पासून …

Read More »

रविवारी कावळेवाडीत विद्यार्थी गुणगौरव सोहळा

  बेळगाव : दरवर्षी प्रमाणे कावळेवाडी (ता. जि. बेळगाव) येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालयतर्फे येत्या रविवार दि. 4 जून 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता दहावी परीक्षेतील विशेष गुणवत्ताधारक विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे. हिंडलगा ग्रा. पं. सदस्या रेणू गावडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभास प्रमुख …

Read More »

हॉकी बेळगाव-यश इव्हेंटस पुरस्कृत हॉकी प्रशिक्षण शिबिराची सांगता

  बेळगाव (प्रतिनिधी) : केवळ हॉकी खेळण्यासाठीच नव्हे तर शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त होण्यासाठी तसेच विविध स्तरांवर स्वतःचे प्रतिनिधित्व सिद्ध करण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने हॉकी बेळगावने मुला-मुलींसाठी मोफत हॉकी प्रशिक्षण सुभाषचंद्र बोस (लेले मैदान) टिळकवाडी येथे शिबिराचे आयोजन केले होते. याचा लाभ ५० मुला-मुलींनी घेतला, असे अध्यक्ष घुळाप्पा होसमनी यांनी …

Read More »

बी. के. कॉलेजमध्ये 5 रोजी सत्कार, व्याख्यानाचे आयोजन

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगांव, ज्योती करियर अकॅडमी बेळगाव, भाऊराव काकतकर महाविद्यालय, ज्योती पदवी पूर्व महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी संघटना बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या सोमवार दि. 5 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता आयएएस 2023-24 परीक्षा उत्तीर्ण परीक्षार्थींचा सत्कार सोहळा, मार्गदर्शन शिबिर आणि व्याख्यान अशा संयुक्त …

Read More »

ब्रह्माकुमारीतर्फे बेळगावात तंबाखू विरोधी दिनाचे आचरण

  बेळगाव : महांतेश नगर येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय महाविद्यालयाच्या वतीने बुधवारी बेळगाव रेल्वे स्थानकावर जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव उपविभागाच्या प्रमुख राजयोगिनी बी. के. अंबिका यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माउंट आबू येथील ब्रह्मकुमारी मुख्यालयातून आलेल्या बी. के. अच्युत यांनी …

Read More »

कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन!

  बेळगाव : हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून पुन्हा नव्याने लढा उभा करण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीने कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करताना केला. हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकात गुरुवारी सकाळी कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील नऊ हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. सीमा भागातील कन्नड सक्ती हटावी यासाठी 1 जून 1986 रोजी मोठ्या प्रमाणात …

Read More »

कर्नाटकातील चामराजनगरजवळ हवाई दलाचे ट्रेनर विमान कोसळले, दोन्ही पायलट सुरक्षित

बेंगळूरू : भारतीय हवाई दलाचे सूर्य किरण ट्रेनर विमान गुरुवारी कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्याजवळ कोसळले. चामराजनगर शहरापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या बोगापूरा येथील मकाली गावाजवळ ही घटना घडली. “या दुर्घटनेतून एका महिलेसह दोन्ही पायलट सुरक्षित बचावले आहेत. त्यांना बंगळूरला एअरलिफ्ट करण्यात आले आहे,” अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. IAF चे एक …

Read More »

राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता!

  बेंगळुर : राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बंगळुरू शहर, ग्रामीण, म्हैसूर, चिक्कमंगळूरू, शिमोगा, कोडगु, हासन आणि कोलार जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडेल. त्यामुळे या भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तरेकडील अनेक भागात पाऊस सुरूच होता आणि पाऊस पडत असलेल्या भागात …

Read More »

विद्यार्थी बसपास अर्ज स्वीकारण्यास ४ जूनपासून सुरुवात

  बेळगाव : परिवहन मंडळाकडून विद्यार्थी बसपास अर्ज स्वीकारण्यास ४ जूनपासून सुरुवात होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. वायव्य परिवहन मंडळाकडून बसपास वितरणाची सर्व तयारी पूर्ण केली असून, यंदा प्रथमच स्मार्टकार्डच्या धर्तीवर पीव्हीसी बसपास ऑनलाईन दिले जाणार आहेत. चार्जिंगपासून घरी ऑनलाइन प्रक्रिया सुरू होणार असली तरी स्मार्टकार्डप्रमाणे असणारे बसपास तयार करण्यासाठी …

Read More »