Sunday , September 8 2024
Breaking News

LOCAL NEWS

शहर शिक्षकांच्या क्रीडास्पर्धाना प्रारंभ

बेळगांव (वार्ता) : अनगोळ येथील संतमीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटना आयोजित संतमीरा शाळेच्या 40 वर्षंपुरती निमित्त बेळगाव शहर शिक्षकांच्या क्रीडा स्पर्धांना शनिवार ता. 18 डिसेंबरला संतमीरा शाळेच्या मैदानावर प्रारंभ झाला. सदर स्पर्धेत 500 हून अधिक शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मंगला …

Read More »

मंत्र्याच्या राजीनाम्यावर काँग्रेस तर समितीवर बंदीसाठी निजद कडून दोन्ही सदनात गोंधळ

  बेळगाव – हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या सहाव्या दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सदनात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. काँग्रेस पक्षाने विद्यमान भाजप मंत्र्याच्या जमीन घोटाळा आणि राजीनाम्याच्या मागणीवर ताठर भूमिका घेतली आहे. याचवेळी निधर्मी जनता दलाच्या आमदारांनी संगोळी रायण्णा यांच्या पुतळा अवमान प्रकरणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बंदी घालण्याच्या मागणीवरून दोन्ही सदनात गोंधळ …

Read More »

एन. डी. पाटील राष्ट्रवीर शामराव देसाई पुरस्काराने सन्मानित

बेळगाव : येथील शतकमहोत्सवी साप्ताहिक राष्ट्रवीर यांच्या वतीने संस्थापक संपादक शामराव देसाई यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्काराने ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांना गौरविण्यात आले २५ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, घोंगडी असे पुरस्काराचे स्वरूप आहे. रुईकर कॉलनी येथील निवासस्थानीच झालेल्या छोटेखानी पुरस्कार सोहळ्यात लढवय्या नेत्यांसोबतच्या आठवणी जाग्या केल्याने …

Read More »

मराठा समाज व शिवजयंती चित्ररथ महामंडळाकडून शिवरायांचे पूजन

बेळगाव : बेंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे झालेल्या विटंबनेच्या पार्श्वभूमीवर बेळगाव येथील मराठा समाज व शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्यावतीने बेळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिषेक घालून पूजन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज हे ठराविक जाती-धर्माचे नसून सकल भारतीयांचे श्रद्धास्थान आहेत त्यांची विटंबना म्हणजे भारतीय संस्कृतीचा …

Read More »

शिवपुतळा विटंबना; बेळगावात जमावबंदी, दगडफेकप्रकरणी २७ जणांना अटक

बेळगाव : बंगळूर येथे शिवपुतळा विटंबनाप्रकरणी बेळगावात शनिवारी सकाळपासून जमावबंदी आदेश जारी केला आहे. शुक्रवारी रात्री शहरात ठिकठिकाणी दगडफेक प्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले असून २७ जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोन दिवसांपूर्वी बंगळूर येथे शिवपुतळ्याची विटंबना झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. शुक्रवारी रात्री याचे पडसाद बेळगावात उमटले. रात्री दहाच्या …

Read More »

ग्रामीण भागात उत्तम आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सरकार कटिबद्ध : डॉ. के. सुधाकर

बेळगाव (वार्ता) : ग्रामीण भागात सर्वोत्तम आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. संपूर्ण देशात उत्तम आरोग्य सेवा पुरविण्यात कर्नाटक राज्य अग्रस्थानी आहे, अशी प्रतिक्रिया आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली. अंकली या गावात नव्याने बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. बेळगाव …

Read More »

रोजगार द्या किंवा 9 हजार बेकार भत्ता द्या; युवा काँग्रेसचा सुवर्णसौधवर धडक मोर्चा

बेळगाव (वार्ता) : राज्यातील बेरोजगार युवक-युवतींना एक तर रोजगार द्या किंवा दरमहा 9 हजार रुपये बेकार भत्ता द्या अशी मागणी कृती युवा काँग्रेसच्या वतीने बेळगावात आज भव्य आंदोलन करण्यात आले. बेळगावात सुवर्णसौधमध्ये सुरु असलेल्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी युवा काँग्रेसने बेरोजगारीवर आवाज उठवत सरकारचे लक्ष वेधले. शब्द दिल्याप्रमाणे एक तर …

Read More »

बार असोसिएशनच्या मुलभुत सुविधांसाठी 2 कोटी रुपये मंजुर करा : आमदार अनिल बेनके

बेळगांव (वार्ता) : दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजी राज्य कायदा मंत्री जे. सी. मधुस्वामी यांच्यासोबत आमदार अनिल बेनके यांनी बार असोसिएशनला भेट दिली. वकील व बार असोसिएशनच्या मागणीप्रमाणे बेळगांव कोर्ट आवारात मुलभुत सुविधा उपलब्ध करण्यासाठी 2 कोटी अनुदान मंजुर करावे, अशी मागणी आमदार अनिल बेनके यांनी केली. या संदर्भात बोलताना …

Read More »

लोकांचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठीच धर्मांतर विरोधी कायदा : सिद्धरामय्या

बेळगाव (वार्ता) : आपले अपयश झाकून लोकांचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठीच भाजप धर्मांतर विरोधी कायदा आणू पहात आहे असा आरोप विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केला. बेळगावात शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना धर्मांतर बंदी कायद्याबाबतच्या प्रश्नावर सिद्धरामय्या म्हणाले, हा कायदा गरजेचं आहे का? भाजप लोकांचे ध्यान इतरत्र वळवण्यासाठी हा कायदा आणत आहे. जबरदस्तीने धर्मांतर …

Read More »

घटनेची पायमल्ली पंतप्रधानांच्या कानावर घालेन : मंत्री आठवले

बेळगाव : बेळगावसह सीमाभागात घटनेची पायमल्ली करून जर मराठी जनतेवर अन्याय केला जात असेल तर याची माहिती मी नक्कीच माननीय पंतप्रधानांच्या कानावर घालेन, असे आश्वासन महाराष्ट्राचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांच्या शिष्टमंडळाला दिले. बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांच्या शिष्टमंडळाने दिल्ली मुक्कामी आज शुक्रवारी …

Read More »