बेळगाव : 1 सप्टेंबर 2023 रोजी नेताजी हायस्कूल सुळगा येथे पार पडलेल्या येळ्ळूर क्लस्टर प्रतिभा कारंजी स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. कन्नड काव्यवाचन लक्ष्मी लोहार प्रथम, चर्चा स्पर्धेत करुणा मजूकर प्रथम, रांगोळी स्पर्धेत रेश्मा कुगजी प्रथम, मिमिक्री स्पर्धेत समर्थ दणकारे प्रथम, …
Read More »LOCAL NEWS
दहावी, बारावीच्या यापुढे दरवर्षी तीन परीक्षा : मधु बंगारप्पा
बंगळूर : राज्यातील दहावी (एसएसएलसी) आणि बारावी (द्वितीय पीयूसी) विद्यार्थ्यांसाठी वर्षातून तीन वेळा परीक्षा लिहिण्याची संधी दिली जाईल, अशी घोषणा शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांनी केली. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग आणि उच्च शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विधानसौध येथील बँक्वेट हॉलमध्ये आयोजित …
Read More »हत्तरगी येथील हरिकाका गोसावी ऋग्वेदी भागवत मठात गोकुळ अष्टमी उत्सव; गायक अजित कडकडेंची उपस्थिती
बेळगाव : हत्तरगी (यमकनमर्डी) ता. हुक्केरी जि. बेळगाव येथील हरिकाका गोसावी ऋग्वेदी भागवत मठात गोकुळ अष्टमी उत्सव बुधवार दि. ६ ते ९ सप्टेबर पर्यंत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. आनंद उर्फ नरसिंह एकनाथ गोसावी यांनी “बेळगाव वार्ता” प्रतिनिधीशी बोलताना दिली. बुधवार दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी …
Read More »गणपती आगमन व विसर्जन मिरवणुक मार्गाची प्रशासनाकडून पाहणी
बेळगाव : येत्या 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांनी गणपती आगमन व विसर्जन मिरवणुक मार्गाची पाहणी केली. गणेशोत्सव काळात विविध सोयीसुविधा पुरविण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. जिल्हाधिकाऱ्यांसमवेत महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, शहर पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धारामप्पा, कायदा व सुव्यवस्था पोलीस उपायुक्त एस. …
Read More »मुतगा शाळेत के. एल. ई कॉलेजतर्फे आरोग्य शिबिर
बेळगाव : के. एल. ई. होमियोपॅथीक मेडिकल कॉलेजच्या वतीने पी. यु. कॉलेज आणि न्यू इंग्लिश स्कूल मुतगा येथे आरोग्य व स्वच्छता जागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष आर. वाय. पाटील होते. प्रारंभी ईशस्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेचे मुख्याध्यापक बी. बी. …
Read More »रिद्धीव्हिजनच्या संचालिका निशा नागेश छाब्रिया यांचे निधन
बेळगाव : बेळगावातील रिद्धीव्हिजन केबलच्या संचालिका व प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या निशा नागेश छाब्रिया यांचे आज मुंबईत अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती मेट्रोकास्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे एमडी उद्योगपती नागेश, पुत्र सुमुख, कन्या रिद्धी, सून, जावई असा परिवार आहे. बेळगावात रिद्धीव्हिजन या नावाने पहिली केबलसेवा सुरु करण्यात पती नागेश …
Read More »कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसमध्ये जाणार नाही : माजी आमदार अनिल बेनके
बेळगाव : उत्तरचे माजी आमदार अनिल बेनके पक्षांतर करणार याबाबत प्रसारमाध्यमांवर उलटसुलट चर्चा सुरू आहे. माजी आमदार अनिल बेनके यांना पक्षाने विधानसभेचे तिकीट नाकारल्यामुळे ते पक्षांतर करणार असल्याचे चर्चेला उधाण आले होते. मात्र यात काही तथ्य नाही ती केवळ अफवाच असल्याचे माजी आमदार अनिल बेनके यांनी पत्रकार परिषदेत बोलताना …
Read More »१३४ तालुक्यांच्या संयुक्त सर्वेक्षणानंतर दुष्काळग्रस्तची अधिकृत घोषणा
मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय बंगळूर : पावसाळ्यात जून आणि ऑगस्टमध्ये राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी आणि महसूल विभागाच्या संयुक्त पाहणीनंतर राज्यातील १३४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले जातील, असे महसूलमंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी सांगितले. याबाबत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, नैसर्गिक आपत्तींबाबत निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची …
Read More »दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी पैशांऐवजी १० किलो तांदूळ : मंत्री मुनियप्पा
बंगळूर : राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांना पैशांऐवजी १० किलो तांदूळ दिला जाईल, असे अन्नमंत्री के. एच. मुनियप्पा यांनी सोमवारी सांगितले. आज शहरात पत्रकारांशी बोलताना मंत्री म्हणाले की, राज्यातील ११४ तालुक्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. या तालुक्यांना १० किलो तांदूळ वाटपाची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळी तालुक्यांमध्ये पाच किलो तांदळासाठी रोख …
Read More »आयपीएस संजीव पाटील यांची बदली; डॉ. भीमाशंकर गुलेद बेळगावचे नवे एसपी
बेळगाव : राज्याच्या पोलीस विभागात एकूण 35 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर आयपीएस अधिकाऱ्यांची ही सर्वात मोठी बदली आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे सरकारी आदेश रात्री उशिरा निघाले. डॉ. भीमाशंकर गुलेद बेळगावचे नवे एसपी डॉ. भीमाशंकर गुलेद आयपीएस (KN- 2012), पोलिस उपायुक्त, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta