Thursday , September 19 2024
Breaking News

LOCAL NEWS

महाराष्ट्राने सीमाबांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे : युवा समिती

बेळगाव : बेळगावातील सीमाबांधवांना होत असलेल्या अन्यायाविरुद्ध पाठिंबा देण्यासाठी दिनांक 1 नोव्हेंबर रोजी होणार्‍या काळ्या दिनी उपस्थित राहून निषेध नोंदवावा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने महाराष्ट्राचे नगर विकास, सार्वजनिक बांधकाम आणि सीमा समन्वयक मंत्री शिंदे यांना देण्यात आले. युवा समितीच्यावतीने आज मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यात आली. …

Read More »

कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे निधन

बेंगळुरू : कन्नड चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेते सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे शुक्रवारी हृदयाघाताने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे अभिनय सृष्टीवर शोककळा पसरली आहे. कन्नड चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेते पुनीत राजकुमार यांचे शुक्रवारी दुपारी बेंगळूर येथील विक्रम हॉस्पिटलमध्ये हृदयघाताने निधन झाले. पॉवर स्टार म्हणून ख्याती असलेले पुनीत राजकुमार यांच्यावर बेंगळूरमधील विक्रम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु …

Read More »

फोटोग्राफर असोसिएशन अध्यक्षपदी डी. बी. पाटील यांची निवड

बेळगाव : बेळगांव शहर आणि तालुका फोटो व्हिडिओग्राफर्स असोसिएशन बेळगांव यांची नुतन कार्यकारी मंडळ निवड बैठक नुकतीच पार पडली. सदर बैठक रामदेव गल्ली येथील गिरीश कॉम्प्लेक्सच्या शहीद भगतसिंग सभागृहात संपन्न झाली. असोसिएशनच्या अध्यक्षपदी डी. बी. पाटील, उपाध्यक्ष पदी संतोष पाटील, सचिव पदी संजय हिशोबकर उपसचिव पदी नामदेव कोलेकर, खजिनदार पदी …

Read More »

बेळगांव ग्रामीण भाजपच्यावतीने देसूर मराठी शाळेला सात ग्रीन बोर्डाची देणगी

बेळगाव : बेळगांव ग्रामीण भाजपच्यावतीने देसूर येथील मराठी शाळेला सात ग्रीन बोर्डाची देणगी देण्यात आली. मंगळवार दि. 25 ऑक्टोबर रोजी मराठी शाळा येथे सदर कार्यक्रम पार पाडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष रणजित पोटे यांनी भुषविले होते. प्रारंभी मराठी शाळेच्या विद्यार्थ्यानी ईशस्तवन व प्रास्ताविक आनंद पाटील यांनी केले तर स्वागत मुख्याधापक …

Read More »

बेळगावच्या तीन समाजसेवकांचा कुर्ली येथे सत्कार!

बेळगाव : कोरोना काळात नागरिकांच्या मदतीसाठी धावून गेलेल्या बेळगावमधील सामाजिक कार्यकर्त्यांचा हनुमान तालीम आणि शिंत्रे आखाडा कुर्ली यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. बेळगावातील फेसबूक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर, सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर आणि हेल्प फोर निडीचे सुरेंद्र अनगोळकर यांचा सत्कार करण्यात आला. संतोष दरेकर हे नेहमी गरजूंना वेळेवर रक्त मिळावे आणि …

Read More »

…म्हणे महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घाला; करवेची कोल्हेकुई

बेळगाव : कर्नाटक राज्योत्सव दिन धुमधडाक्यात साजरा करण्याऐवजी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे काळा दिन आचरणात आणण्यात येतो, यामुळे या समितीवर संपूर्णपणे बंदी घालण्याची मागणी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. प्रत्येक वर्षी 1 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने काळा दिन पाळण्यात येतो. याविरोधात करवे संघटनेने कन्नड भाषिकांचा अपमान होत असल्याचे म्हटले …

Read More »

माध्यान्ह आहारात लवकरच दुधाचे वाटप

बेंगळुरू : शाळांमधील इयत्ता पहिली ते दहावीचे पर्यंतचे वर्ग पूर्वपदावर आल्यामुळे तयार माध्यान्ह आहार वितरणास सुरुवात झाली असून लवकरच विद्यार्थ्यांना क्षीरभाग्य योजनेअंतर्गत दुधाचे वाटप केले जाणार आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शिक्षण खात्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या 23 ऑगस्टपासून नववी ते दहावी तर 6 सप्टेंबरपासून इयत्ता सहावी …

Read More »

सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

बंगळूरू : कर्नाटक सरकारने बुधवारी (ता. 27) आपल्या कर्मचार्‍यांसाठी महागाई भत्त्यात (डीए) वाढ करून दीपावलीची भेट दिली आहे. सरकारी कर्मचार्‍यांचा डीए आता त्यांच्या मूळ वेतनाच्या 21.5 टक्क्यांवरून 24.5 टक्के करण्यात आला आहे. तीन टक्के डीए वाढविल्याचे वित्त विभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. 1 जुलैपासून महागाई भत्ता वाढ पूर्वलक्षीपणे लागू …

Read More »

दुर्गम भागात 100 शिधापत्रिकांमागे एक रेशन दुकान

राज्य सरकारचा निर्णय : डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट बंगळूरू : कर्नाटक सरकारच्या योजनेनुसार सर्व काही चालले तर, कर्नाटकातील दुर्गम भागात राहणार्‍या लोकांना रेशन विकत घेण्यासाठी लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागणार नाही किंवा ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तृतीय पक्षांवर अवलंबून राहावे लागणार नाही. कारण, रेशन दुकानांपर्यंत प्रवेश नसलेल्या सर्व दुर्गम भागात रास्त …

Read More »

येळ्ळूरमधील श्री शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची बैठक संपन्न

येळ्ळूर : येळ्ळूर येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची दुसरी बैठक रविवार ता. (24) रोजी सकाळी 11 वाजता श्री शिवाजी विद्यालयच्या सभागृहात, मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी उपस्थित अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले. त्यानंतर सर्वांच्या विचारांती चर्चा करून येळ्ळूरमधील व नोकरीनिमित्त बाहेर गावी …

Read More »