Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगाव दक्षिण मतदारसंघासाठी उद्यापासून निवड प्रकिया

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदारसंघातील उमेदवार निवडीसाठी निवड समिती तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून, मंगळवार (ता. ११) पासून बैठका घेऊन उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगाव दक्षिण मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी माजी आमदार मनोहर किणेकर, रमाकांत कोंडुसकर, शुभम शेळके, नगरसेवक रवी साळुंखे, आप्पासाहेब गुरव, वल्लभ गुणाजी, मदन बामणे व ऍड. रतन मासेकर यांनी उमेदवार अर्ज दाखल केले आहेत. यामधून एका उमेदवाराची निवड करण्यासाठी निवड कमिटी स्थापन करण्यासाठी पाच जणांची समिती नेमण्यात आली होती. समितीने मतदार संघातील कार्यकर्ते व इतर लोकांशी चर्चा करून निवड समिती तयार केली आहे. निवड समिती उमेदवारांच्या मुलाखती व इतर प्रकारची प्रक्रिया पूर्ण करून उमेदवाराचे नाव अंतिम करणार असल्याची माहिती देण्यात आली.
आचारसंहिता लागू झाल्यामुळे कोणत्याही प्रकारची बैठक घेण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे परवानगीसाठी संबंधित विभागाकडे अर्ज देण्यात आला असून १० ते १५ मार्चपर्यंत बैठका घेण्याची परवानगी मागण्यात आली आहे. त्यामुळे निवड प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. उत्तर मतदार संघातील उमेदवार निवडीसाठी २८ लोकांची कमिटी या पूर्वीच तयार करण्यात आली असून निवड जाहीर केली जाणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

अलतगा सरकारी मराठी शाळेत आषाढी एकादशीनिमित्त बालवारकऱ्यांची दिंडी उत्साहात

Spread the love  अलतगा : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त अलतगा येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *