Tuesday , September 17 2024
Breaking News

LOCAL NEWS

उचगावमधील रस्ते-गटारीचे काम शास्त्रीय पद्धतीने करा

ग्रामस्थांचे खासदारांना साकडे उचगाव : उचगावमधील लक्ष्मी गल्ली आणि गणपत गल्लीत सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे रस्ता व गटार निर्माण काम अशास्त्रीय पद्धतीने करण्यात येत आहे. ते शास्त्रीय पद्धतीने, लोकांना अनुकूल होईल अशारीतीने करण्याची मागणी ग्रामस्थांतर्फे खा. मंगल अंगडी यांच्याकडे करण्यात आली आहे. उचगावमधील लक्ष्मी गल्ली आणि गणपत गल्लीतील रहिवाशांनी बुधवारी खा. …

Read More »

तालुका आरोग्याधिकार्‍यांच्या निषेधार्थ बेळगावात निदर्शने

बेळगाव : ‘आयुष’ डॉक्टर्स हे बोगस डॉक्टर्स असल्याचे विधान तालुका आरोग्याधिकारी डॉ. शिवानंद मास्तिहोळी यांनी केले आहे. त्याच्या निषेधार्थ आयुष फेडरेशनच्या बेळगाव तालुका शाखेतर्फे निदर्शने करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. बेळगाव तालुका आरोग्याधिकारी डॉ. शिवानंद मास्तिहोळी यांनी एका वृत्तपत्राला ‘आयुष’ डॉक्टर्स हे बोगस डॉक्टर्स असल्याचे सांगितले होते. त्याच्या निषेधार्थ डॉ. …

Read More »

आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते वंटमुरी कॉलनीतील कामाचा शुभारंभ

समाज कल्याण विभागातून निधी मंजूर बेळगाव : समाज कल्याण विभागातून येथील वंटमुरी कॉलनीतील विकास कामाला चालना देण्यात आली आहे. या भागात अनेक दिवसांपासून रस्ते, गटार, ड्रेनेज, पथदीप यासह अनेक सुविधांचा अभाव होता. त्यामुळे येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन या भागातील विकास कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. सदर कामाचा शुभारंभ आमदार …

Read More »

चोरटा गजाआड : 11 मोटरसायकली जप्त

बेळगाव : माळमारुती पोलिसांनी एका अट्टल मोटरसायकल चोरट्याला गजाआड करून त्याच्याकडील सुमारे 7 लाख रुपये हुन अधिक किमतीच्या 11 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सदाशिव कट्टीमणी आणि माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शहर आणि …

Read More »

कुंचीमुळे श्वास गुदमरून अर्भकाचा मृत्यू

बेळगाव : डोक्याला घालण्याची कुंचीची दोरी गळ्याभोवती आवळली गेल्यामुळे अवघ्या सहा दिवसांच्या स्त्री जातीच्या एका अर्भकाचा श्वास गुदमरून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना नेहरूनगर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नुकतीच घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, हिंडलगा येथील ज्योती सागर जाधव (वय 21) या महिलेला बाळंतपणासाठी नेहरूनगर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल …

Read More »

बेळगावात पुन्हा कानडी दादागिरी, मराठी बांधवांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली!

राज्योत्सव मात्र कोविड नियमावलीनुसार साजरा करणार बेळगाव : कर्नाटक- महाराष्ट्र सीमालढ्याचे केंद्रबिंदू असलेल्या बेळगाव शहरात 1 नोव्हेंबर हा दिवस सीमाभाग महाराष्ट्रापासून तोडून कर्नाटकात घेतला गेल्याच्या निषेधार्थ काळा दिवस म्हणून पाळला जातो. गेल्या सहा दशकात यात कधीही खंड पडला नाही आणि सदनशीर मार्गाने मूकफेरी काढून सीमावासीय मराठी जनता आपला निषेध व्यक्त …

Read More »

मंत्रिपदासाठी आ. रमेश जारकीहोळींची थेट दिल्लीतून फिल्डिंग

बेळगाव : मध्यंतरी काही काळ शांत बसलेल्या गोकाकचे आ. रमेश जारकीहोळी यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची कुणकुण लागल्याने त्यांनी आता दिल्ली गाठली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची खबर लागल्याने आ. रमेश जारकीहोळी यांनी दिल्ली गाठली आहे. याआधी हात दिलेले मंत्रिपद येनकेन प्रकारे …

Read More »

आमदारांनी दांडी मारल्यामुळे बुडाची सभा लांबणीवर

बेळगाव : बेळगाव शहराच्या विकासासंदर्भात महत्वाची चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या ‘बुडा‘च्या बैठकीला भाजप आमदारांच्या अनुपस्थितीचे ग्रहण लागले. त्यामुळे ही बैठक लांबणीवर टाकण्यात आली. बेळगाव नगरविकास प्राधिकरणाची चौथी बैठक सोमवारी बोलावण्यात आली होती. गेल्या सलग दोन बैठकांना गैरहजर असलेले भाजप आ. अभय पाटील आणि अनिल बेनके या बैठकीलाही अनुपस्थित होते. मात्र …

Read More »

दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल 55.54 टक्के

बेंगळुरू : अलिकडेच झालेल्या 2021चा दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी निकाल जाहीर केला आहे. एकूण 53 हजार 155 विद्यार्थ्यांपैकी 29 हजार 522 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व 55.54 टक्के निकाल लागला. 27 आणि 29 सप्टेंबर रोजी दोन दिवस दहावीची पुरवणी …

Read More »

दसर्‍यानंतर पहिली ते पाचवी शाळा भरविण्याची तयारी!

बेंगळुरू : दसरा संपताच राज्यातील शाळांत पहिली ते पाचवीचे प्राथमिक वर्ग भरविण्याची संपूर्ण तयारी सरकारने पूर्ण केली आहे. माध्यान्ह आहारासह सर्व आवश्यक तयारीपूर्ण केल्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी दिली. बेंगळूर येथे सोमवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना शिक्षणमंत्री नागेश म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील कोविड तांत्रिक सल्ला समितीची बैठक …

Read More »