Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

जय-पराजयाचा विचार सोडून स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी होणे महत्त्वाचे : किरण जाधव

  बेळगाव : स्पर्धेत जय- पराजय ही दुय्यम बाब असून स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या कलागुणांना सादर करणे महत्त्वाचे आहे, असे भाजप कर्नाटक राज्य ओबीसी युवा मोर्चा सचिव आणि सकल मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव म्हणाले. कन्नड महिला संघ, साहित्य कला वेदिकेच्यावतीने रविवारी टिळकवाडी येथील दुसऱ्या रेल्वे फाटकानजिकच्या वरेरकर नाट्य भवन …

Read More »

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी गांभीर्याने

  बेळगाव : श्री धर्मवीर छ. संभाजी महाराज चौक बेळगाव सकाळी 09.30 वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे सालाबादप्रमाणे श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त पुजन करण्यात आले. सुरुवात प्रेरणा मंत्राने करण्यात आली. बेळगाव सीमाभाग शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर आणि संघटक तानाजी पावशे, मंगेश नागोजीचे यांच्या हस्ते पुष्पहार घालून …

Read More »

पाचवी, आठवी परीक्षेचा घोळ

  विनाअनुदानित खासगी शाळांचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान; २७ मार्चला सुनावणी बंगळूर : पाचवी आणि आठवीच्या बोर्ड परीक्षेबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला आव्हान देणारी याचिका विनाअनुदानित खासगी शाळांच्या संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. यावर २७ मार्च रोजी सुनावणी करण्याचे सरन्यायाधिशांनी मान्य केले. …

Read More »

राजहंसगडावर राबविली समिती नेत्यांनी स्वच्छता मोहीम!

  बेळगाव : काल झालेल्या दुग्धाभिषेक सोहळ्यासाठी बेळगांव परिसरातून हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. हा दिमाखदार सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी बेळगाव शहर तसेच ग्रामीण भागातून बहुसंख्येने लोक उपस्थित होते. त्यामुळे गड परिसरात कचरा निर्माण झाला होता. म. ए. समितीच्या माध्यमातून आज सोमवारी गड परिसरात स्वच्छता माहीम राबविण्यात आली होती. …

Read More »

आपची ८० उमेदवारांची पहिली यादी जाहीर; बैलहोंगलमधून चिक्कनगौडर, अथणीतून संपतकुमार शेट्टी

  बंगळूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रथमच पदार्पण करणाऱ्या आम आदमी पक्षाने (आप) सोमवारी ८० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. राज्यातील सर्व २२४ विधानसभा क्षेत्रांमध्ये उमेदवार उभे करणार असल्याचे सांगण्यात आले. पक्षाचे राज्य प्रमुख पृथ्वी रेड्डी यांनी यादी जाहीर केल्यावर दावा केला की, आप हा झपाट्याने वाढणारा राजकीय पक्ष असल्याने …

Read More »

बेळगाव तालुका व शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची संयुक्त बैठक उद्या

  बेळगाव : राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजाच्या मूर्तीला दुग्धाभिषेकाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त शिवभक्तांनी सहकार केले त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी बेळगाव तालुका व शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची संयुक्त बैठक मंगळवार दिनांक २१ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे आयोजित करण्यात आली आहे. रविवार दिनांक १९ …

Read More »

कर्नाटकातील भ्रष्टाचारावर पंतप्रधान मुग गिळून गप्प

  राहुल गांधींची बेळगावच्या जाहिर सभेत घणाघाती टीका बेळगाव : राज्यातील विकास कामात 40% कमिशन घेतले जात असल्याचा आरोप कॉन्ट्रॅक्ट असोसिएशन ने केला आहे. या संदर्भात कॉन्ट्रॅक्ट असोसिएशन स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे. मात्र त्या पत्राचे उत्तर पंतप्रधानांनी अद्यापही दिलेले नाही. कर्नाटकातील भ्रष्टाचारावर पंतप्रधान मूग …

Read More »

कुद्रेमानी गावात अधिकाऱ्यांचा छापा; मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या टिपीन बॉक्ससह साहित्य जप्त…!!

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कुद्रेमानी गावात रविवारी सायंकाळी ग्रामीण भागातील मतदारांना वाटण्यासाठी भाजप नेत्याच्या घरी जमा करण्यात आलेल्या टिपीन बॉक्ससह काही भेटवस्तू अधिकाऱ्यांनी जप्त केल्याची घटना घडली. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील कुद्रेमानी गावातील भाजप नेत्याच्या घरी मतदारांसाठी टिपीन बॉक्ससह काही साहित्य जमा करून ठेवण्यात आले होते. मात्र याबाबत खात्रीशीर माहिती …

Read More »

अनधिकृत खाण प्रकरणात ५.२१ कोटीची मिळकत जप्त; ईडीकडून कारवाई

  बंगळूर : बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) बंगळूर विभागीय कार्यालयाने मिनरल एंटरप्रायझेस लिमिटेड आणि त्याच्या अधिकार्‍यांची ५.२१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असल्याचे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जप्त केलेली मालमत्ता आरोपींच्या मालकीच्या सहा स्थावर मालमत्तांच्या स्वरूपात आहे. विशेष तपास पथक आणि कर्नाटक लोकायुक्त यांनी दाखल केलेल्या …

Read More »

पंतप्रधान मोदी २५ मार्चला पुन्हा कर्नाटक दौऱ्यावर

  बंगळूर : पुढील आठवड्याच्या शेवटी (ता. २५), पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा राज्यात येत आहेत. ते दावणगेरे, चिक्कबळ्ळापूर आणि बंगळुर येथे विविध कामे आणि प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. त्याच निमित्ताने बंगळुरमध्ये भव्य रोड शो होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शनिवारी (ता. २५) सकाळी दिल्लीहून थेट बंगळुरला पोहोचतील, बहुप्रतिक्षित केआरपुरा-व्हाइटफिल्ड मेट्रो …

Read More »