Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

आयपी संचांसाठी सोलर पॅनल देण्याचा निर्णय; मंत्री जॉर्ज

  खासगी उत्पादकांकडून १,१०० मेगावॅट वीजपुरवठा बंगळूर : ऊर्जा कंपन्या तात्काळ विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी पुढील तीन दिवसांत खासगी वीज उत्पादकांकडून १,१०० मेगावॅट अतिरिक्त वीज खरेदी करतील. राज्य सरकारने वीज कायदा कलम ११ अंतर्गत खासगी वीज उत्पादकांकडून वीज खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. दरम्यान, आयपी संचांसाठी सोलर पॅनल देण्याचा निर्णय …

Read More »

मनरेगांतर्गत बाकी रक्कम ४७८ कोटी मंजूर करा

  मुख्य सचिव वंदिता शर्मा यांचे केंद्राला पत्र बंगळूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत राज्याची बाकी असलेली ४७८.४६ कोटी रुपये देण्याचे मुख्य सचिव वंदिता शर्मा यांनी केंद्रीय ग्रामीण विकास विभागाच्या सचिवांना पत्र लिहिले आहे. राज्यातील २३६ तालुक्यांपैकी १९५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. त्यापैकी १६१ तालुक्यांमध्ये तीव्र …

Read More »

चक्क ट्रान्सफॉर्मरमधून मद्य वाहतूक; एकाला अटक

  बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेकायदा मद्य वाहतूक करणारा (एम. एच. ४३ वाय – २९७६) क्रमांकाचा ट्रक हिरेबागेवाडी टोलनाक्यावर थांबवून तपासणी केली असता. ट्रकमध्ये बनावट ट्रान्सफॉर्मर ठेवून त्यामधून मद्यसाठ्याची वाहतूक करण्याऱ्या प्रकाराचा पर्दाफाश झाला. यावेळी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन, बेकायदा मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक करण्यात आला. …

Read More »

बेळगाव- पंढरपूर रेल्वेसाठी वारकरी मंडळाचे प्रशासनाला साकडे

  बेळगाव : बेळगाव- पंढरपूर रेल्वे सुरू करा, अशा मागणीचे निवेदन बेळगावच्या वारकरी मंडळातर्फे आज मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. बेळगाव जिल्ह्यातून पंढरपूरला मोठ्या संख्येने भाविक वर्षभर प्रवास करत असतात. बेळगावहून पंढरपूरला जाण्यासाठी रेल्वेचा प्रवास सोयीचा ठरतो. यापुर्वी बेळगावहून सुरू असलेल्या बेळगाव-पंढरपूर रेल्वे सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. बेळगाव-पंढरपूर रेल्वे, बेळगावहून …

Read More »

जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी घेतला कित्तूर महोत्सवाच्या कामाचा आढावा

  बेळगाव : यावेळी देखील कित्तूर उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. महोत्सवाच्या मुख्य मंचाचे बांधकाम, कुस्ती आखाडा, भोजन व्यवस्था, प्रदर्शन, नौकाविहार यासह सर्व तयारी पूर्ण ताकदीने करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.कित्तूर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी (१७ ऑगस्ट) कित्तूरच्या किल्ल्याच्या प्रांगणात झालेल्या प्राथमिक बैठकीत ते बोलत होते. …

Read More »

जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाने नुकसान भरपाई द्यावी; हसिरू क्रांती संघटनेची मागणी

  बेळगाव (वार्ता) : बेळगाव तालुक्‍यातील बेक्कीनकेरी ग्रामपंचायतीने गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाच्या बांधकामामुळे जमिनी गमावलेल्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळावा. याबाबत कर्नाटक राज्य हरित सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. बेळगाव तालुक्यातील बेक्कीनकेरी ग्रामपंचायतीच्या अतिवाड गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून तलाव बांधल्यामुळे ज्यांची जमीन गेली त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. …

Read More »

भाजपसोबतची युती धजद प्रदेशाध्यक्षांनी फेटाळली

  धजद आता फुटीच्या मार्गावर; आमदारही संपर्कात असल्याचा दावा बंगळूर : धर्म निरपेक्ष जनता दला (धजद)चे सुप्रीमो एच. डी. देवेगौडा यांचा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करण्याचा निर्णय फेटाळत पक्षाच्या कर्नाटक शाखेचे अध्यक्ष सी. एम. इब्राहिम यांनी सोमवारी धजद पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील होणार नसल्याचे सांगितले. पक्षात …

Read More »

येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या वतीने हेस्कॉमला निवेदन सादर

  बेळगाव : येळ्ळूर ग्रामपंचायतच्या व्याप्तीतील पाणी पुरवठा संदर्भात नाल्याला लागून असलेली धोकादायक स्थितीतील विद्युत वाहिनी रस्त्याच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे, गावातील इतर ठिकाणी जीर्ण झालेले खांब हटवून नविन खांब उभारणी करण्यासंदर्भात तसेच ग्रामदेवता चांगळेश्वर देवी परिसर आवारा शेजारी जिथं एक शाळाही आहे आणि जिथं गावातील यात्रोत्सव आणि इतर …

Read More »

बेळगाव तालुका क्षत्रिय मराठा परिषद पदाधिकारी निवड जाहीर

  डी. बी. पाटील अध्यक्षपदी ; उपाध्यक्ष रोहण कदम तर कार्याध्यक्षपदी आर.के. पाटील सचिवपदी रवी पाटील व एस. व्ही. जाधव यांची निवड बेळगाव (वार्ता) : कर्नाटक राज्यातील क्षत्रिय मराठा परिषद व बेळगाव जिल्हा क्षत्रिय मराठा परिषदतर्फे सोमवार दि. 16 ऑक्टोबर रोजी डी.बी.पाटील फोटो स्टुडिओ कार्यालयात बेळगाव तालुका क्षत्रिय परिषदेची नूतन …

Read More »

काळ्यादिनाबाबत मध्यवर्ती समितीने घेतली पोलिस आयुक्त आणि उपायुक्तांची भेट

  बेळगाव : 1 नोव्हेंबर काळा दिनाच्या पार्श्वभूमीवर सायकलफेरीचा मार्ग आणि काळ्यादिनाबाबत पोलिस आयुक्त आणि उपायुक्तांची मध्यवर्ती म. ए. समिती नेत्यांनी भेट घेऊन निवेदन पत्र दिले. 1956 पासून महाराष्ट्र एकीकरण समिती 1 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारच्या पक्षपाती निर्णयाविरोधात काळादिन पाळत आहे. या दिवशी सकाळी निषेध फेरी निघते आणि त्यानंतर मराठा …

Read More »