Sunday , September 20 2026
Breaking News

मुख्यमंत्री सिद्धरामय्या देणार राजीनामा; डी. के. शिवकुमार नवे मुख्यमंत्री

Spread the love

 

बंगळुरू : कर्नाटकच्या राजकारणातून मोठी घडामोड समोर आली असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गुरुवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण ‘ब्रेकफास्ट मीटिंग’मध्ये त्यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर हा निर्णय जाहीर केल्याचे सांगितले जात आहे.

या बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे देखील त्यांच्या शेजारी उपस्थित होते. सिद्धरामय्या आज दुपारी ३ वाजता राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या बंगळुरू येथील निवासस्थानी सकाळी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी सर्व मंत्र्यांसमोर मुख्यमंत्रीपद सोडण्याचा निर्णय स्पष्ट केल्याची चर्चा आहे. राज्यपाल गेहलोत हे वैयक्तिक कारणास्तव राज्याबाहेर असल्याने राजीनामा त्यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, या घडामोडींनंतर कर्नाटकमध्ये नव्या मुख्यमंत्री निवडीसाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची (CLP) बैठक लवकरच बोलावली जाणार आहे. या बैठकीत डी. के. शिवकुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या राजकीय घडामोडींमुळे कर्नाटकच्या सत्ताकारणात मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत असून राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *