Monday , September 21 2026
Breaking News

नारळ विक्रीच्या पैशांच्या वाटणीवरून तरुणाची निर्घृण हत्या

Spread the love

 

दोन संशयित ताब्यात

कागवड (प्रतिनिधी) : कागवाड तालुक्यातील ऐनापूर गावात नारळ विक्रीच्या पैशांच्या वाटणीवरून झालेल्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे ऐनापूर आणि उगार परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणाची ओळख संतोष सिद्धप्पा कामटे (वय ३३, रा. ऐनापूर) अशी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष कामटे हा आपल्या दोन मित्रांसोबत बागेतील नारळ विकण्यासाठी उगार येथे गेला होता. नारळ विक्रीनंतर तिघांनी मद्यप्राशन केले आणि त्यानंतर ते ऐनापूरकडे परतत होते. यावेळी नारळ विक्रीतून मिळालेल्या पैशांच्या वाटणीवरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर संतोषच्या डोक्यात दोन मित्रांनी दगडाने वार करून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक तसेच बोटांचे ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळाची पाहणी करून पुरावे संकलित केले.

अथणीचे डीवायएसपी प्रशांत मुन्नोळी, सीपीआय संतोष हल्लूर आणि पीएसआय राघवेंद्र खोत यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती घेतली.

या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. क्षुल्लक कारणातून घडलेल्या या हत्याकांडामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *