Monday , September 21 2026
Breaking News

केएचएमए, बेळगावच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे 31 रोजी पदग्रहण, वैज्ञानिक परिषद

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशन (केएचएमए), बेळगाव शाखेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ व वैज्ञानिक परिषद येत्या रविवार दि. 31 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता गांधी भवन, हॉटेल सन्मान जवळ, बेळगाव येथे संपन्न होणार होणार आहे.

सदर कार्यक्रमात संघटनेच्या डॉ. व्ही. व्ही. वेर्णेकर (अध्यक्ष), डॉ. सोनाली सरनोबत (कार्याध्यक्ष), डॉ. श्रेयस जीनराळकर (सचिव), डॉ. संतोष मगदूम (संघटन सचिव) या नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा अधिकृत पदग्रहण सोहळा पार पडणार आहे. पदग्रहण समारंभानंतर विशेष वैज्ञानिक परिषद आयोजित करण्यात आली असून परिषदेत अनुभवी होमिओपॅथिक तज्ज्ञ आणि प्रख्यात वक्ते आधुनिक निदान पद्धती, नैतिक वैद्यकीय मूल्ये आणि क्लिनिकल व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

वैज्ञानिक सत्रांचे तपशील पुढीलप्रमाणे आहे.

1) व्याख्याते : प्रा. डॉ. संतोष एम. रानडे, कोल्हापूर (विषय -क्लासिकल होमिओपॅथिक उपचारपद्धतीमध्ये आधुनिक डायग्नोस्टिक उपकरणांचा वापर), 2) व्याख्याते : डॉ. नरेंद्र पाटील, गडहिंग्लज (विषय -गंभीर रुग्ण प्रकरणे आणि होमिओपॅथीद्वारे त्यांचे व्यवस्थापन), 3) व्याख्याते : प्रा. डॉ. किरण एन. पाटील, बेळगाव (विषय -होमिओपॅथिक वैद्यकीय व्यवसायातील नैतिकता व व्यावसायिक जबाबदारी).

ही वैज्ञानिक परिषद डॉक्टर, प्राध्यापक, पीजी विद्यार्थी आणि इंटर्न यांच्यासाठी ज्ञानवर्धक व मार्गदर्शक ठरणार असून अनुभवांची देवाणघेवाण आणि शैक्षणिक प्रगतीसाठी उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. नूतन पदाधिकाऱ्यांनी बेळगाव जिल्ह्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांना एकत्रित करून शैक्षणिक उपक्रम, सार्वजनिक आरोग्य अभियान आणि व्यावसायिक विकास कार्यक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. उपरोक्त कार्यक्रमाप्रसंगी होमिओपॅथी शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे, नैतिक वैद्यकीय सेवा, डॉक्टरांमधील एकात्मता आणि समाजाभिमुख आरोग्यसेवा बळकट करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात येणार आहे. तरी सर्व होमिओपॅथिक डॉक्टर, प्राध्यापक, पीजी विद्यार्थी, इंटर्न तसेच होमिओपॅथीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *