Monday , September 21 2026
Breaking News

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा; राज्यपालांच्या मुख्य सचिवांकडे पत्र सुपूर्द

Spread the love

 

बंगळुरू : कर्नाटकच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांच्या मुख्य सचिवांकडे सुपूर्द केला आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्ली येथे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत सुरू असलेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्री बदलाच्या मुद्द्यावर मंगळवार आणि बुधवारी दिल्लीमध्ये काँग्रेस नेत्यांच्या महत्त्वाच्या बैठका पार पडल्या. या बैठकींना डी. के. शिवकुमार, के. सी. वेणुगोपाल यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. बैठकीनंतर सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, गुरुवारी दुपारी सिद्धरामय्या लोकभवनात पोहोचले. मात्र राज्यपाल गेहलोत हे बंगळुरूत नसल्याने त्यांनी आपले राजीनामापत्र राज्यपालांचे मुख्य सचिव प्रभू शंकर यांच्याकडे सुपूर्द केले.

सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यपाल गहलोत बुधवारी रात्री मुंबईमार्गे इंदूरला रवाना झाले होते. कौटुंबिक कारणामुळे ते इंदूरला गेल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकभवनात राजीनामा सुपूर्द करताना मुख्य सचिव प्रभू शंकर यांनी काही तांत्रिक अडचणी असल्याचे सांगत प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *