Sunday , July 26 2026
Breaking News

बंधुभाव, एकतेचा संदेश देत निपाणी परिसरात बकरी ईद साजरी

Spread the love

 

 

निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील इदगाह परिसरात अंजुमन कमिटी आणि मुस्लिम बांधवांतर्फे बकरी ईदचा सण गुरुवारी (ता.२८) उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ८ वाजता नेहरू चौकातील मशिदी जवळ एकत्र जमून मुस्लिम बांधवांनी ईदगाह परिसरात सामूहिक नमाज पठण करून अल्लाहची प्रार्थना करण्यात आली. नमाजानंतर सर्वांनी एकमेकांना आलिंगन देत बकरी ईद मुबारकच्या शुभेच्छासह बंधुभाव व एकतेचा संदेश दिला. याशिवाय देशात शांतता निर्माण होऊन वेळेवर पाऊस होण्यासाठी प्रार्थना केली.

यावेळी इदगाह परिसरात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. सर्वांनी पारंपरिक वेशभूषेत येऊन सणाचा आनंद लुटला. याशिवाय समाजातील एकोप्याचे दर्शन घडले. मुस्लिम बांधवांच्या जीवनात बकरी ईद या सणाला विशेष महत्त्व आहे. बुधवारी चंद्र दर्शन झाल्याने गुरुवारी हा सण साजरा करण्यात आला.
हा सण संयम, त्याग, दया आणि परस्पर प्रेम यांचे प्रतीक मानला जातो. बकरी ईदच्या दिवशी गरीब व गरजू लोकांना मदत (जकात व फितर) देण्याची परंपरा असून, समाजातील सर्व घटकांनी आनंदाने सहभागी व्हावे, हा संदेश दिला. येथील इदगाह मैदानावर साजऱ्या झालेल्या या ईद उत्सवाने धार्मिक श्रद्धा, सामाजिक एकता आणि बंधुभाव यांचे दर्शन दिसून आले. मुस्लिम धर्मगुरूंनी मार्गदर्शन केले.
यावेळी अंजुमन कमिटीचे पदाधिकारी आणि निपाणीतील समस्त मुस्लिम बांधव उपस्थित होते. येथील नगरपालिकेतर्फे नमाज पठाण च्या वेळी पाण्याची सोय केली होती. तर अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहर आणि उपनगरात पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. दुपारी आणि सायंकाळी मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांना ईदच्या जेवणाचे निमंत्रण दिले होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *