बेळगाव : मध्यवर्ती बस स्थानकावर पाकीटमारीचे प्रकार वाढीस लागले आहेत. रविवारी रात्री संकेश्वर येथील एका महिलेच्या बॅगमधून दहा हजार रुपये लांबवल्याची घटना घडली आहे. या घटनेने बस स्थानकावरील गैरप्रकार चव्हाट्यावर आले आहेत. मध्यवर्ती बस स्थानकात भुरट्या चोऱ्या करणाऱ्या पाकीटमारांचा सुळसुळाट झाला आहे. रविवारी सायंकाळी साडे सात ते आठ या …
Read More »LOCAL NEWS
कामचुकार सफाई कामगारांना महापालिका आयुक्तांचा दणका!
बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंडी यांनी सोमवारी सकाळी शहराचा फेरफटका मारत पाहणी केली व कामचुकार सफाई कामगारांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. शहरात ठिकठिकाणी साचलेला कचरा आयुक्तांच्या नजरेत आल्यामुळे त्यांनी सफाई कामगार व कंत्राटदारांना चांगलेच धारेवर धरले आहे. वारंवार होत असलेल्या कचरा उचल संदर्भातल्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांनी सोमवारी पहाटे …
Read More »कृषीमंत्र्यांवर लाच घेतल्याचा आरोप; सहायक कृषी अधिकाऱ्यांची राज्यपालांकडे तक्रार
बेंगळुरू : कृषी मंत्री चालुवरायस्वामी यांच्यावर लाचखोरीचा आरोप करत ७ सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. कृषी मंत्री चालुवरायस्वामी यांच्यावर कृषी अधिकाऱ्यांनी 6 ते 8 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असून लाचखोरीला आळा घातला नाही तर विष प्राशन करून आत्महत्या करू, असे या अधिकाऱ्यांनी …
Read More »गणेशोत्सव संदर्भात पालकमंत्र्यांची आज महत्वपूर्ण बैठक
बेळगाव : गणेश महामंडळांच्या कोणकोणत्या मागण्या प्रशासनाकडे आहेत यासाठी बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी गणेश महामंडळ तसेच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. आज सोमवार दि. 7 ऑगस्ट रोजी बेळगाव महापालिकेच्या सभागृहात सायंकाळी 5:30 वाजता सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखालीच सदर बैठक होणार आहे. या बैठकीत जिल्हा प्रशासन, पोलीस, …
Read More »बेळगावच्या खेळाडूंनी मारली बाजी
बेळगाव : बेंगळुरू येथील सी एम ए ग्रँड हॉल येथे आज दि. 6 ऑगस्ट रोजी झालेल्या जपान शोटोकॉन इंडिपेंडेंस कप ओपन चॅम्पियन स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले आहे. या ओपन चॅम्पियन स्पर्धेत 1500 हून अधिक खेळाडूंनी सहभाग दर्शवला होता. बेळगाव येथील सेल्फ डिफेन्स स्कूल ऑफ इंडियन कराटेच्या विद्यार्थ्यांनी …
Read More »बिजगर्णी येथे विद्युत तारेच्या धक्क्याने शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
बेळगाव : हेस्कॉम विद्युत वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथील शेतकरी दाम्पत्याचा शेतात काम करत असताना विद्युत तार अंगावर अचानक पडल्याने शॉक लागून शेतकरी दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. 32 वर्षीय निसार महंमद मकबूल सनदी आणि 26 वर्षीय लता निसार सनदी अशी मृतांची नावे असून त्यांना एक लहान मुलगी …
Read More »रिंग रोडविरोधात न्यायालयीन लढा; समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांचा निर्धार
बेळगाव : शेतकऱ्यांचा मोठा विरोध असतानाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रिंगरोडसाठी अधिसूचना काढली असून याविरोधात आता उच्च न्यायालयात लढा देण्याचा निर्धार तालुका म. ए. समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांनी घेतला. कॉलेज रोडवरील तालुका म. ए. समितीच्या कार्यालयात शनिवारी शेतकऱ्यांची बैठक झाली. अध्यक्षस्थानी ऍड. राजाभाऊ पाटील होते. रिंगरोडविरोधात शेतकरी वर्षभरापासून तीव्र लढा देत …
Read More »जैन मुनी हत्या; सीआयडी पथकाची हिरेकोडी आश्रमला भेट
बेळगाव : हिरेकोडी नंदीपर्वत आश्रमाचे जैन मुनी कामकुमार यांच्या खून प्रकरणासंदर्भात सीआयडी, आर्थिक गुन्हे आणि विशेष विभाग डीजीपी डॉ. एम. ए. सलीम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज हिरेकोडीसह विविध ठिकाणी भेटी दिल्या. डीजीपी डॉ. एम. ए. सलीम यांनी सीआयडी आयजीपी प्रवीण पवार, आयजीपी एनआर विकासकुमार विकास यांच्यासह सीआयडीच्या संपूर्ण तपास …
Read More »अग्निवीरांची पहिली तुकडी देशसेवेसाठी सज्ज!
बेळगाव : कठोर लष्करी प्रशिक्षणाचा उपयोग करून मातृभूमीच्या रक्षणासाठी सदैव सज्ज रहा, सेवाकाळानंतरही एक चांगले नागरिक बनून देशसेवा करा, असे आवाहन ज्युनियर लीडर्स विंगचे कमांडर मेजर जनरल आर. एस. गुराया, व्हीएसएम यांनी केले. बेळगावातील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये इन्फन्ट्रीच्या यशस्वीपणे प्रशिक्षण घेतलेल्या पहिल्या अग्निवीर तुकडीचा शानदार शपथविधी समारंभ …
Read More »बेळगावातील विविध संस्था, संघटनांच्या कार्यकर्त्यांची सोमवारी बैठक
बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा जोतिबा फुले, राजा राममोहन रॉय, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु या महापुरुषांविषयी अत्यंत हीन पातळीवरून संतापजनक वक्तव्ये केली आहेत. भारताला मिळालेले स्वातंत्र्यही ते मानत नाहीत. १५ ऑगस्ट रोजी काळा दिवस पाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांची ही वक्तव्ये देशविरोधी व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta