Wednesday , April 22 2026
Breaking News

उचगाव येथे पारायण सोहळ्याला प्रारंभ

Spread the love

 

उचगाव : श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळा मार्कंडेय नदीकिनारी उचगाव येथे तुकाराम बीज ते नाथ षष्ठी अखेर आज पासून सुरुवात करण्यात आली असून मंगळवार दिनांक 14 मार्च रोजी काला कीर्तनाने या पारायण सोहळ्याची सांगता होणार आहे.
हभ प बाळू भक्तीकर आणि हभप गोपाळ मरूचे यांच्या अधिष्ठानखाली या पारायण सोहळ्याला सुरुवात झाली असून यावेळी मंडपाचे उदघाटन विनायक चौगुले यांच्या करण्यात आले ते घट पूजन रोहित गोल्याळकर, गणेशपूजन निरंजन अष्टेकर, ज्ञानेश्वर मूर्ती पूजन बाळू चांदीलकर, तुकाराम मुर्तीपूजन शटूप्पा बांडगे, ग्रंथ पूजन चंद्रकांत कृष्णाजी कदम पाटील, तुळस पूजन भगवान पाटील, होम पूजन नागेश पाटील, विनापूजन नागेश बेळगावकर, तर पारायण उदघाटन देवाप्पा शहापूरकर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ध्वजवंदन विमा प्रतिनिधी अशोक डी. चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले.

उचगाव विभाग मार्कंडेय नदीकिनारी गेली ३८ वर्षे याठिकाणी पारायण सोहळ्याला प्रतिवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. तुकाराम बीज ते एकनाथ षष्ठी अखेर हा पारायण सोहळा सुरू असतो. सोहळ्यामध्ये दररोज काकड आरती, गाथा भजन, प्रवचन, नित्यपूजन, महिला भजन, कीर्तन, निरूपण, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, ध्वजवंदन, संगीत भजन जागर, आणि प्रवचन असे दररोज विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामध्ये नित्य काकडा आरती हभ प गोपाळ मरुचे, तर नित्य हरिपाठ यल्लाप्पा चौगुले, तर नित्य पूजन ह भ प भूषण फडके, यांच्या हस्ते करण्यात येते, या पारायण सोहळ्यासाठी शुक्रवार पासुन मंगळवार अखेर प्रयत ध्वजवंदन साठी म्हणून उमेश चोपडे, निंगाप्पा नाईक, म. ए. समिती युवा नेते आर एम चौगुले, ग्रामीणचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, कृष्णा पाटील यांच्या हस्ते दररोज ध्वजवंदन करण्यात येणारा असून यामध्ये पारायण सोहळ्यात राजू कावळे, उमेश पावशे, यल्लाप्पा पाटील, परशराम कनगुटकर, आणि परशराम चौगुले यांचे प्रवचन होणार आहे.
विश्वनाथ पाटील, मारुती महाराज, आणि संतोष सहस्त्रबुद्धे आणि बाळू भक्तीकर यांची प्रवचन होणार आहे तर पुंडलिक पाटील, मारुती तुंणतुणे आणि बाळू भक्तीकर यांचे कीर्तन होणार आहे. तर बेळगुंदी, येळेबैल, सुळगा, कल्लेहोळ, गोजगा, तुरमुरी, मण्णूर, बाची, शिनोळी, बसुते आणि कोनेवाडी यांचे दररोज जागर भजन होणार आहे. यावर्षी सोमवार दिनांक 13 मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता उचगाव, चुरमुरी, कल्लेहोळ, बेळगुंदी, मण्णूर आणि बसुर्ते या गावातील विविध मान्यवरांच्या हस्ते दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. मंगळवार दिनांक १४ रोजी दुपारी १२ वाजता हभप निवृत्ती मुचंडीकर यांच्या हस्ते कालाकितन व मंडपाभोवती दिंडी काढुन पारायण सोहळ्याची सांगता होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *