Tuesday , September 17 2024
Breaking News

LOCAL NEWS

कर्नाटकात मंत्रिमंडळाचे खातेवाटप; कत्ती यांच्याकडे वन व अन्न आणि नागरी पुरवठा खाते

शशिकला जोल्ले यांना धर्मादायसह हज व वक्फ खाते बेंगळुरू : कर्नाटकात मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर झाले आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांनी महत्वाची खाती स्वत:कडेच ठेवली आहेत. मुख्यमंत्री बोम्मई यांनी अर्थ, बंगळूर विकास आणि मंत्रिमंडळ कामकाज यासह महत्वाची खाती स्वत:कडेच ठेवली आहेत. पहिल्यांदाच मंत्री बनलेल्या अरगा ज्ञानेंद्र यांच्याकडे गृह खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली …

Read More »

रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, 4.5 कोटीचे रक्तचंदन जप्त

बेंगळुरू : अवैधपणे साठा करून विदेशात विकण्याचा प्रयत्न करताना बेंगळूर सीसीबी पोलिसांनी रक्तचंदनाचा मोठा साठा ताब्यात घेतला. त्याची सुमारे 4.5 कोटी रुपये किंमत होते. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. कम्मनहळ्ळीचे आनंद कुमार (वय 51) आणि अनिल सिंग (वय 47) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या रक्तचंदनाच्या ओंडक्यांचे …

Read More »

सुनीता निंबरगी यांची एसीएफपदी बढती

बेळगाव (वार्ता) : सौंदत्ती विभागाच्या वनक्षेत्रपाल म्हणून सेवा बजावणाऱ्या आएफओ सुनीता एम. निंबरगी यांना साहाय्यक अधिकारीपदी (एसीएफ) बढती मिळाली आहे. सुनिता निंबरगी यांनी यापूर्वी बेळगाव वन विभागात यशस्वीरित्या सेवा बजावली आहे. त्यांच्या सेवेचा सुनीता निंबरगी विचार करून त्यांना बढती देण्यात आली आहे.बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या त्या ज्येष्ठ …

Read More »

‘आजादी का अमृतमहोत्सव’ चर्चासत्र संपन्न

बेळगाव (वार्ता) : शहरातील राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे आयोजित ‘आजादी का अमृतमहोत्सव’ या विषयावरील चर्चासत्र शुक्रवारी उत्तम प्रतिसादात पार पडले. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली यानिमित्त या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सदर चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डाॅ. विनोद गायकवाड हे होते. आपले समयोचित …

Read More »

मराठी पत्रकार संघ आणि जिव्हाळा फाऊंडेशनच्यावतीने मंगळवारी कृतज्ञता गौरव सोहळा

बेळगाव : बेळगावातील मराठी पत्रकार संघ आणि जिव्हाळा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने मंगळवार 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता जिल्हा रुग्णालय आवारातील आय.एम.ए. सभागृहात गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात कोरोना काळात विशेष सेवा बजावलेल्या पत्रकारांचा गौरव करण्यात येणार आहे. कोरोना काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता, धोका …

Read More »

स्केटिंगपटू करुणा वाघेला जिल्हा बाल प्रतिभा पुरस्काराने सन्मानित

बेळगाव (वार्ता) : बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीची स्केटिंगपटू करुणा राजन वाघेला हिला 2021 सालचा जिल्हा बाल प्रतिभा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. मागील सात वर्षात तिने स्केटिंग क्षेत्रात केलेल्या उल्लखनीय कामगिरीबद्दल तिला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तिने स्केटिंग क्षेत्रात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी बजावीत अनेक …

Read More »

बेळगावसह सीमेवरील जिल्ह्यात शनिवार आणि रविवार वीकेंड कर्फ्यूची घोषणा

बेळगाव (वार्ता) : कर्नाटक राज्यातील कोरोना संकट गंभीर होताना दिसत आहे. कोरोनानं हळूहळू सर्वच शहरांमध्ये हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. कोरोनानं डोकं वर काढलं आहे. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन संपूर्ण राज्यात नाईट कर्फ्यू लागू (रात्री 9 ते सकाळी 5) करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळेत कलम 144 लागू राहील.तसेच सीमेवरील …

Read More »

जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त बेळगावचे सुप्रसिद्ध प्रसूतीतज्ञ डॉ. दत्तप्रसाद गिझरे यांचे व्याख्यान

बेळगाव (वार्ता) : दि.१ ऑगस्टते ७ ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून आचरला जातो. यानिमित्ताने गिझरे मेटर्निटी हॉस्पिटलतर्फे बेळगावचे सुप्रसिद्ध प्रसूतीतज्ञ डॉ. दत्तप्रसाद गिझरे-मंजुषा गिझरे यांचे स्तनपान आणि मातेच्या दुधाचे महत्व याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. आई व बाळ यांच्यामधील स्तनपानाची प्रक्रिया कशी महत्वाची असते याविषयी स्लाईड शोद्वारे डॉ. …

Read More »

मुख्यमंत्री, आमदारांना पत्रे; युवा समितीकडून मोहिमेत सहभागी होण्याची विनंती

बेळगाव (वार्ता) : सीमाप्रश्‍नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा आणि सीमावासीयांना न्याय मिळवून द्यावा यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे ऑगस्ट क्रांती दिनी पत्र पाठवून लक्ष वेधण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या मोहीमेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्र्यांनी सहभागी व्हावे यासाठी युवा समितीतर्फे मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्र राज्यातील खासदार आणि …

Read More »

सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आधार!

बेळगाव (वार्ता) : हनमन्नावर गल्ली अनगोळ येथे गेल्या दोन-तीन वर्षापासून ३०-३५ वर्षीय अनोळखी महिला फिरत होती. तिला कुटुंबाचा आधार नव्हता. तेथील नागरिक तिला अन्न पाणी देऊन तिची भूक भागवत होते. पण हल्ली तिचे मानसिक संतुलन खूपच बिघडल्याने ती तेथील नागरिकांना शिवीगाळ करत होती व नग्नावस्थेत फिरत होती. येथील नागरिकांना, महिला …

Read More »