Thursday , May 28 2026
Breaking News

संघटनात्मक कार्यातूनच समाजाची सर्वांगीण प्रगती शक्य; विनय शिंदे यांचे प्रतिपादन

Spread the love

 

प्रोत्साह फाउंडेशन समगार (चर्मकार) समाज वधू-वर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

बेळगाव : चर्मकार समाज अद्यापही अनेक बाबतीत मागे आहे समाजाच्या उन्नतीसाठी चांगले उपक्रम हाती घेणे आवश्यक आहे सांघिक कार्यातूनच समाजाची सर्वांगीण प्रगती शक्य आहे, असे प्रतिपादन चर्मकार समाजाचे नेते विनय शिंदे यांनी केले

बेळगावातील प्रोत्साह फाउंडेशनच्या वतीने काल रविवारी कुमार गंधर्व रंगमंदिरात (चर्मकार) समाज वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्याला जमखंडी अर्बन बँकेचे चेअरमन आप्पासाहेब मनगुळी चर्मकार समाजाचे कर्नाटक राज्य अध्यक्ष शिवानंद मब्रुमकर, समाजाचे ज्येष्ठ नेते फकीरप्पा बेटगिरी, चर्मकार समाज नेते ऍड. वाय. सी. कांबळे एलआयसीचे निवृत्त अधिकारी अशोक होनकरी आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना विनय शिंदे म्हणाले, चर्मकार समाजाच्या जागृतीसाठी विविध उपक्रम राबविणे आवश्यक आहे. अशा उपक्रमातून समाजाचा लाभ होणार आहे. समाज बांधवांनी संघटितरित्या कार्य केल्यास निश्चितच यश मिळेल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अन्य मान्यवरांनी यावेळी समयोचित विचार व्यक्त केले. या कार्यक्रमात एम. मंजुनाथ यांना चर्मकार रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. सुरेश सांगली यांनी सर्वांचे स्वागत केले. सागर कित्तूर यांनी अतिथींचा परिचय करून दिला. प्रोत्साह फाउंडेशनचे अध्यक्ष वासुदेव दोडमणी यांनी प्रास्ताविक केले. चंद्रकांत वाघमारे यांनी आभार मानले. मल्लिकार्जुन ताळीकोटी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात 190 जणांनी वधू वर सूचक मेळाव्यात नोंदणी केली.

About Belgaum Varta

Check Also

जयनगर-हुंचेनहट्टी परिसरात तरुणाची तलवारीने निर्घृण हत्या; बेळगाव हादरले

Spread the love  बेळगाव : जयनगर-हुंचेनहट्टी परिसरात बुधवारी सायंकाळी एका 23 वर्षीय तरुणाची तलवारीने वार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *