Thursday , September 19 2024
Breaking News

LOCAL NEWS

कणकुंबी भागातील ४५ वर्षावरील ९०% जणांना कोरोना लसीचा पहिला डोस : आरोग्यधिकारी डॉ. बी. टी. चेतन

बेळगाव (वार्ता) : कोरोना काळात जनतेला वैद्यकीय सेवेसाठी विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला. मात्र योग्य नियोजनाद्वारे कणकुंबी परिसरातील ३२ गावातील जनतेला चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळवून देण्याचे काम कणकुंबी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. कणकुंबी भागातील ४५ वर्षावरील ९०% जणांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. …

Read More »

बंद असलेली पारवाड- खानापूर वस्ती बस पूर्ववत करण्याची मागणी

खानापूर (वार्ता) : पारवाड – खानापूर वस्ती बस गेल्या सहा महिन्यापासून कोरोनाच्या महामारीमुळे बंद करण्यात आल्यामुळे जांबोटी-कणकुंबी भागातील प्रवासी, महाविद्यालयीन विद्यार्थी वर्गांचे हाल होत आहेत. सदर बस त्वरित पूर्ववत करावी, अशी मागणी होत आहे. खानापूर आगारातुन गेल्या अनेक वर्षापासून पारवाड -खानापूर अशी वस्ती बस सुरू करण्यात आल्यामुळे जांबोटी कणकुंबी भागातील …

Read More »

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचा अधिकारग्रहण कार्यक्रम संपन्न

अध्यक्षपदी संजय पाटील यांची तर सचिवपदी विजय बनसुर यांची फेरनिवड बेळगाव (वार्ता) : माझी संघटना माझी जबाबदारी म्हणून प्रत्येकाने कार्य केले तर नक्कीच ती संघटना नावारूपाला येते. आज नूतन अध्यक्ष आणि त्यांच्या संचालक मंडळींनी शपथ घेतली असून पुढील वर्षभर समाजाप्रती निष्ठा ठेऊन सामाजिक कार्यात अग्रेसर व्हा, असा सल्ला जायंट्स फेडरेशनचे …

Read More »

महानगरपालिकेवर मराठी फलक लावा तसेच भाषिक कायद्यानुसार मराठी भाषिकांना सुविधा पुरवा

केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांनी दिले आदेश बेळगाव (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव यांनी महानगरपालिकेवर मराठी फलक लावण्यासाठी मनपा आयुक्तांना तसेच जिल्हाधिकारी यांची भेट घेतली होती पण तिथून काहीच प्रतिसाद न भेटल्याने युवा समितीने थेट केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री श्री. मुख्तार अब्बास नक्वी तसेच चेन्नई येथील भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांना पत्र …

Read More »

जिव्हाळा फौंडेशनच्यावतीने डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण शिबीर

बेळगाव (वार्ता) : गुडस् शेड रोड, बेळगाव येथील नर्तकी प्राईड येथे जिव्हाळा फौंडेशनच्यावतीने डेंग्यू आणि चिकुनगुनिया प्रतिबंधक लसीकरण शिबिर आयोजिण्यात आले होते. या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून भाजप ओबीसी मोर्चाचे कर्नाटक राज्य सचिव किरण जाधव यांना निमंत्रित करण्यात आले होते.यावेळी बोलताना किरण जाधव यांनी, जिव्हाळा फौंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. तसेच नागरिकांनी …

Read More »

कोरोना नियमावलीनुसार साजरा करणार शहापूर व्यापारी मंडळ यंदाचा गणेशोत्सव

अध्यक्ष पदी अशोक चिंडक तर सेक्रेटरीपदी संजय झंवर यांची निवड बेळगाव : शहापूर येथील श्री व्यापारी मित्र मंडळाच्या श्री सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्यावतीने यंदा कोरोना नियमावलीचे पालन करीत गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.गणेशोत्सवासंदर्भात चर्चाविमर्ष करण्यासाठी रविवार दि.1 ऑगस्ट रोजी मंडळाच्या सभासदांची बैठक बोलविण्यात आली होती. कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी …

Read More »

वाहतूक समस्येचे निवारण करावे : सिटीझन कौन्सिलचे निवेदन सादर

बेळगाव (वार्ता) : बेळगाव शहरातील वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या आदी समस्यांसंदर्भात सिटिझन्स कौन्सिल बेळगावतर्फे आज वाहतूक व गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांना निवेदन सादर करून संबंधित समस्यांचे लवकरात लवकर निवारण करण्याची मागणी करण्यात आली. सिटिझन्स कौन्सिल बेळगावचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज सोमवारी सकाळी …

Read More »

गावागावात, शाखे-शाखेत पोहोचवणार सीमाप्रश्नाचे पुस्तक : युवा सेनेचे निर्धार

बेळगाव (वार्ता) : ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार आणि माजी प्राचार्य प्रा. आनंद मेणसे लिखित सीमालढ्यावर आधारित ‘संघर्ष महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी’ या पुस्तकाला बेळगावसह सीमाभागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पुस्तक प्रकाशनापूर्वीच वातावरण निर्मिती झाली आहे. हे पुस्तक प्रत्येक गावागावात शाखे -शाखेपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार युवा सेना बेळगावच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. ‘संघर्ष महाराष्ट्रात …

Read More »

सीमाप्रश्नी पत्रांची मोहीम यशस्वी करू

म. ए. समितीच्या महिला आघाडीचा जाहीर पाठिंबा बेळगाव (वार्ता) : खानापूर म. ए. युवा समितीने सीमाप्रश्नाकडे तात्काळ लक्ष देऊन तो सोडवावा या मागणीसाठी सीमाभागातून 11 लाख पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्याची जी मोहीम हाती घेतली आहे त्या मोहिमेला म. ए. समितीच्या रणरागिनी, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, महिला आघाडीच्या …

Read More »

पाण्यातून वाहून जाणाऱ्या इसमाचा जीव वाचविणाऱ्या श्री. कार्लेकर आणि सहकाऱ्यांचा किरण जाधव यांनी केला सन्मान

बेळगाव (वार्ता) : वाहत्या पाण्यात बुडणाऱ्या इसमाचे प्राण वाचविणाऱ्या ऍनिमल फिडर्स ग्रुपचे सदस्य श्री. कार्लेकर यांचा विमल फौंडेशनचे अध्यक्ष आणि भाजप युवा नेते किरण जाधव यांचा शाल-पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.मागील आठवड्यात झालेल्या संततधारेमुळे नदी-नाले ओसंडून वाहत होते. शेती शिवारे तुडुंब भरली होती. रस्त्यावरूनही पाणी वाहत होते. अशा परिस्थितीत 23 …

Read More »