Monday , September 21 2026
Breaking News

शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे : किरण जाधव

Spread the love

बेळगाव : अन्नदाता शेतकरी आर्थिकदृष्ट्या भक्कम झाला तरच देशाचा कणा सक्षम होणार असल्याचे भाजप राज्य ओबीसी युवा मोर्चाचे सचिव आणि सकल मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव म्हणाले.

श्री शेतकरी संघटना मजगाव यांच्यावतीने दिनांक 4 व 5 मार्च रोजी किरण जाधव यांच्या सहकार्याने रिकामी गाडी पळविण्याची जंगी शर्यत आयोजिण्यात आली होती. मजगाव, महामार्गावर ही शर्यत झाली.
प्रारंभी किरण जाधव यांनी गणेश प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित केला.

विज्ञान आणि तंत्रज्ञान किती प्रगत झाले तरी, शेतकऱ्याच्या शेतातील पिकचं कामाला येते. मात्र, आज अन्नदाता शेतकरी आर्थिक पिडीत आहे. ही खेदजनक बाब आहे. शेतकऱ्यांनी शेतीसह कुक्कुटपालन, गो-पालन, मेंढीपालन आदी जोड व्यवसाय करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे किरण जाधव दीप प्रज्वलित केल्यानंतर बोलताना म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी जोड व्यवसाय, सेंद्रिय शेती आदींच्या अनुषंगाने कार्यशाळांचे आयोजन काळाची गरज असल्याचेही किरण जाधव म्हणाले. यापुढेही बैलगाडी ओढण्याची शर्यत यासह महिला व विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून त्यांच्यातील अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी आपले प्रयत्न असतील, असेही किरण जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यानंतर बैलगाडी पूजन व फज्जा पूजनही किरण जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर रिकामी गाडी पळण्याची जंगी शर्यत झाली. बेडगीर येथील ज्योतिबा गुरव यांनी टाईम किपर म्हणून काम पाहिले.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उद्या पार पाडण्यात येणार आहे. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे 25 हजार, 21 हजार आणि 18 हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार असून क्रमांक 4 ते 21 पर्यंतच्या विजेत्यांना अनुक्रमे 16 हजार ते 2 हजार रुपये रोख देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *