Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

लोकांना कार्यक्रमाला आमंत्रित करण्यासाठी प्रत्येकी 500 रुपये द्या; सिद्धरामय्यांचा व्हिडिओ व्हायरल

  बेळगाव : इतर राज्यांतील निवडणूक जाहीर होणे बाकी आहे, मात्र आधीच राज्यभर निवडणुकीचा ज्वर वाढला आहे. विशेषत: राज्याची दुसरी राजधानी असलेल्या कुंदानगरी बेळगावमध्ये निवडणुकीचा आखाडा दिवसेंदिवस व्यस्त होत आहे. यावेळी राज्यातील सत्तेचे सुकाणू हाती घेण्यासाठी काँग्रेस आणि भाजपने सर्वतोपरी प्रयत्न केले असून, निवडणुकीच्या उंबरठ्यावर या दोन्ही पक्षांनी राज्यात महामेळावे …

Read More »

चौथे अ. भा. बेळगाव मराठी साहित्य संमेलन 5 रोजी

  बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा मंदिर बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार दि. 5 मार्च 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरी, मराठा मंदिर, रेल्वे ओव्हर ब्रिज जवळ बेळगाव या ठिकाणी 4 थ्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर संमेलनाचे …

Read More »

शॉर्टसर्किटमुळे किराणा दुकानासह गॅरेज आगीच्या भक्ष्यस्थानी

  बेळगाव : शॉर्टसर्किटमुळे एका किराणी दुकानासह टू व्हीलर गॅरेज आगीच्या भक्षस्थानी पडून हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना विजयनगर तारिहाळ रोड हलगा येथे काल रात्री घडली. विजयनगर तारिहाळ रोड हलगा येथील एका किराणा दुकानासह त्याच्या शेजारी असलेल्या टू व्हीलर गॅरेजला काल बुधवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सदर प्रकार आसपासच्या लोकांना …

Read More »

राजहंसगड येथील छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती अनावरण उद्या

  आमदार लक्ष्मी हेब्बाळकर सहभागी होण्याबाबतची उत्सुकता कायम! बेळगाव : राजहंसगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती अनावरणाचा शासकीय कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. जिल्हा प्रशासन, कन्नड व संस्कृती खाते तसेच कर्नाटक रस्ते सुधारणा मंडळाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी (ता. 2) सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते …

Read More »

निल इंडियन बॉईज हिंडलगा किरण जाधव चषकाचा मानकरी

  येळ्ळूर : श्री चांगळेश्र्वरी स्पोर्ट्स येळ्ळूर यांच्या वतीने श्री चांगळेश्र्वरी हायस्कूल मैदानावर आयोजित केलेल्या ग्रामीण क्रिकेट स्पर्धेत निल इंडियन बॉईज हिंडलगा संघाने एकदंत स्पोर्ट्स कणबर्गी संघाचा 5 गड्यांनी पराभव करून श्री. किरण जाधव चषक 2023 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत एकूण 38 संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या बक्षीस …

Read More »

गवि रेड्यांचा देसूरमध्ये संचार

बेळगाव : बेळगाव तालुक्यात वन्यप्राण्यांचा नागरी वस्तीत शिरकाव होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. येळ्ळूर येथे नागरी वस्तीत हरीण शिरल्याची घटना ताजी असतानाच देसूर येथे गवि रेड्यांनी गावात शिरून ग्रामस्थांना धडकी भरविल्याची घटना घडली. मानवी वस्तीत जंगली प्राण्यांचा शिरकाव होत असल्याच्या घटनांत बेळगाव तालुक्यात वाढ होताना दिसत आहे. येळ्ळूर गावात वाट …

Read More »

बेळगावचे माजी पोलिस कमिश्नर भास्कर राव यांचा “आप”ला रामराम; भाजप प्रवेश

  बेंगळुरू : कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला जोरदार झटका बसला आहे. बेंगळुरूचे माजी पोलीस आयुक्त आणि आप नेते भास्कर राव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राज्यातील सत्ताधारी पक्ष भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भास्कर राव यांनी आज 1 मार्च रोजी भाजपचं सदस्यत्व घेतलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील यांनी …

Read More »

उद्धव ठाकरे यांची बेळगावच्या शिष्टमंडळाशी चर्चा

  बेळगाव : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मुंबई येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने सदिच्छा भेट घेतली. मुंबई येथील आझाद मैदानावर मंगळवारी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन छेडण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर समिती शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांची भेट घेतली पुढील वाटचालीसाठी चर्चा केली. यावेळी समिती नेते …

Read More »

मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे माणूस प्रगल्भ होतो : युवराज पाटील

येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने मराठी भाषा दिनाचे आयोजन येळळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने सोमवार( ता. 27) फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11-00 वाजता श्री शिवाजी विद्यालयाच्या हॉलमध्ये ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, ज्येष्ठ साहित्यिक व कवी कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनाचे औवचित साधून मराठी भाषा दिनाचे …

Read More »

सीमावासियांचा बुलंद आवाज आझाद मैदानावर घुमला!

  बेळगाव : गेल्या 66 वर्षापासून कर्नाटकाच्या जोखंड्यात अडकलेल्या सीमाभाग जोपर्यंत महाराष्ट्रात विलीन होत नाही, तोपर्यंत संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार होत नाही. सीमाभागातील नागरिकांना कर्नाटक सरकारच्या कानडी सक्तीच्या वरवंट्याखाली वागाव लागत आहे, या जुलमी अन्याय अत्याचाराविरुद्ध गेली 66 वर्ष सीमा भागातील मराठी भाषिक लोकशाहीच्या मार्गाने लढत आहे. या मराठी भाषिकांची …

Read More »