तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठकीत निर्णय बेळगाव : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आज तुकाराम बँकेच्या सभागृहात समिती नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर हे होते. या बैठकीत 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ‘चलो मुंबई’ या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना …
Read More »LOCAL NEWS
संताची शिकवण अंगीकारणे ही काळाची गरज! : वाय. पी. नाईक
कावळेवाडी : संतांनी दिलेले विचार आत्मसाथ करा. सातशे वर्षाची थोर आध्यात्मिक जोड असलेला वारकरीपंथ समाजाला वैचारिक व्यासपीठ मिळवून देणारा आहे. पारायणातून खऱ्या अर्थाने आपल्या मनातील वाईट विकार नाहीसे होऊन निस्वार्थी भावनेची पताका मनात डोलणे. भगवी पताका, रामकृष्णहरी हेच वारकऱ्यांचे संस्कार आहेत, समाजात सुख, शांती, समाधान लाभण्यासाठी संताची शिकवण अंगीकारने …
Read More »28 फेब्रुवारीचा “चलो मुंबई” यशस्वी करण्याचा निर्धार!
बेळगाव : 19 फेब्रुवारी रोजी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रंगुबाई पॅलेस येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर समिती अध्यक्ष दीपक दळवी हे होते. 28 फेब्रुवारी रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने “चलो मुंबई”नारा दिला आहे निद्रिस्त महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी सीमावासीयांचे हे आंदोलन होणार आहे. यावेळी …
Read More »मराठा समाजाने एकत्र येण्याची काळाची गरज : म. ए. समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले
बेळगाव : आपण देव देवतांना मानणारे आहोत. आपले 36 कोटी देव आहेत त्यामुळे मराठा समाज हा देव देवतांना मानणारा समाज आहे. त्यामुळे मंदिराची उभारणी करुन देवाची प्रतिष्ठापना केली जाते. मंदिरामधून आपल्याला ऊर्जा शक्ती मिळते आणि मंदिरामध्ये सर्वजण एकत्र येऊन त्या ठिकाणी आपली एकीची भावना दाखवणे हा त्यामागचा एक भाव …
Read More »वैश्यवाणी समाजाच्या वधू-वर व पालक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना, वैश्यवानी महिला मंडळ समादेवी गल्ली बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दि. 19 रोजी वैश्य वाणी वधू वर व पालक मेळावा समाजाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी समारंभाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष दत्ता कणबर्गी, प्रमुख अतिथी म्हणून अखिल गोमांतक वैश्य …
Read More »कॉ. भालचंद्र कांगो यांचे मंगळवारी व्याख्यान
बेळगांव : भारतीय कम्युनिस्ट पक्ष व प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने मंगळवार दि. 21 रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सचिव मंडळाचे सदस्य भालचंद्र कांगो यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. देशाची सध्याची आर्थिक स्थिती हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. गिरीश कॉम्प्लेक्स, कार पार्किंग एरिया, रामदेव गल्ली येथे सायंकाळी पाच वाजता हा …
Read More »बालनाट्य संमेलनाचे वटवृक्षात रूपांतर व्हावे : सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांचे प्रतिपादन
पहिल्या बाल नाट्यसंमेलनाची यशस्वी सांगता बेळगाव : संगीत नाटकांची सुरुवात बेळगावातून झाली. बेळगाव, कोल्हापूर, सांगली या भागात संगीत नाट्य क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी पाहायला मिळाली. बेळगावच्या मातीतच संगीत नाटकाचे बीज रोवले गेले. त्याचप्रमाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या बालनाट्य संमेलनाचे वटवृक्षात रूपांतर व्हावे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी …
Read More »तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक उद्या
बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची सोमवार दिनांक २० रोजी दुपारी ठीक २.०० वाजता मुंबई येथे २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला येते वेळी प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी २८ फेब्रुवारीला सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांची यादी घेऊन येण्याचे आहे, या यादीमध्ये पुरुष किती महिला …
Read More »महाराष्ट्राने येळ्ळूर गावापासून समृद्धीचा धडा घ्यावा, मिलिंद कसबे यांचे प्रतिपादन
बेळगाव : बेळगावला साहित्याची परंपराला लाभली आहे. सीमाभागात होणारी साहित्य संमेलने असेच प्रतीक आहे. येळ्ळूर गावात आयोजित केले जाणारे साहित्य संमेलन प्रत्येकालाच ऊर्जा देणारे आहे. केवळ महाराष्ट्र नव्हे देशातील अनेक गावांनी समृद्ध कसे व्हावे हा धडा या गावाकडून घेतला पाहिजे. गाव वैभव संपन्न करणारी माणसे प्रत्येक गावात पाहिजे, असे …
Read More »वाचा, पहा आणि मगच बोला; सुप्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी
बेळगाव : समाज एका रात्रीत सुधारत किंवा बिघडत नाही. काही चित्रपटांच्या विरोधात सुरू असलेला हॅशटॅग बैन प्रकार निव्वळ प्रसिद्धी मिळवण्याचा एक प्रकार आहे. काही वाचले नसताना आणि काही पाहिले नसताना निषेध नोंदवीणे चुकीचे आहे. वाचा, पहा आणि मगच काय ते बोला, असे परखड मत सुप्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta