Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करा : भागोजी पाटील

  बेळगाव : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्याय अत्याचाराच्या विरोधात हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. या राज्यात त्यांनी बारा बाराबलुतेदराने सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केलं. त्यावेळेस त्यांचं राज्य हे आदर्श राज्य म्हणून पाहिलं जात होतं. या राज्यात महिलांना विशेष सन्मानाने वागणूक दिली जात असे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाला …

Read More »

शहापूर महाराष्ट्र एकिकरण समितीतर्फे मराठा मंदिरास छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र भेट

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर विभाग यांच्याकडून मराठा मंदिरास चित्रकार मिलिंद शिंपी (पुणे) यांचे तैलचित्र मुख्य प्रशस्त हॉलमध्ये लावण्यासाठी भेट देण्यात आली. याप्रसंगी मराठा मंदिरचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव, उपाध्यक्ष नेमिनाथ कंग्राळकर, शिवाजी हंगीरकर, नेताजी जाधव, चंद्रकांत गुंडकल, लक्ष्मणराव सैनुचे, नागेश तरळे, म. ए. समितीचे मदन बामणे, नेताजी जाधव, सुहास …

Read More »

बेळगाव पहिल्या बालनाट्य संमेलनाचे शानदार उद्घाटन

  बेळगाव : बालरंगभूमीला अनेक अडचणींना तोंड देत काम करावे लागत आहे. मुठभर मंडळी बालरंग भूमीसाठी चिकाटीने काम करत आहेत. अशावेळी बालरंगभूमीबद्दलच्या कल्पना सुधारणे आवश्यक आहे. परदेशात मुलांच्या उपक्रमांना प्राधान्य दिले जाते. याचा विचार केल्यास, बालरंगभूमीकडे आपण उघड्या डोळ्यांनी केव्हा पाहणार? असा सवाल अभिनेत्री, नाट्यनिर्देशिका, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि पहिल्या …

Read More »

आई-वडिलांची ही सेवा करणे आजच्या काळात गरजेचे : आर. एम. चौगुले

  बेळगाव (प्रतिनिधी) : आई-वडील हे आपले दैवत आहेत ज्याप्रमाणे आपण देव देवतांची सेवा आमच्या करतो त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांची ही सेवा करणे आजच्या काळात गरजेचे आहे जर आई-वडिलांच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल तर आपण या जगात कुठे पाठीमागे राहू शकत नाही, असे प्रतिपादन म. ए. समितीचे युवा नेते आणि …

Read More »

येळ्ळूरमध्ये उद्या 18 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी खास आकर्षण : संमेलनाची तयारी पूर्ण येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने उद्या रविवार दि. 19 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरीत (मराठी मुलांची शाळा येळळूरवाडी पटांगण परमेश्वर नगर येळळूर) 18 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून साहित्य संमेलन आयोजनाची तयारी …

Read More »

मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्या वतीने शहापूर स्मशानभूमीत महाशिवरात्र साजरी

  बेळगाव – सालाबादप्रमाणे यावर्षीही शहापूर येथील मुक्तिधाम स्मशानभूमीत मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्या वतीने महाशिवरात्री साजरी करण्यात आली. गेल्या 24 वर्षांपासून शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमी मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्या वतीने महाशिवरात्र सोहळा आयोजित केला जातो. महाशिवरात्रीनिमित्त मध्यरात्री आणि पहाटे अभिषेक, पूजा, आरती आदी कार्यक्रम पार पडले. त्यानंतर सकाळपासून प्रसाद वाटप करण्यात …

Read More »

लक्ष्मी हेब्बाळकर-रमेश जारकीहोळी समर्थक आमनेसामने

  बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील राजहंसगड येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या अनावरण सोहळ्यावरून श्रेयवादाचे राजकारण चांगलेच रंगले आहे. आज राजहंसगड परिसरात काँग्रेस आमदार चन्नराज हट्टीहोळी व भाजपा नेते रमेश जारकीहोळी सामोरासमोर आले. त्यावेळी उभयतांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मूर्ती अनावरण सोहळ्यावरून भाजपा -काँग्रेसमध्ये श्रेयवादाचे राजकारण सुरू …

Read More »

राज्याचा लोकप्रिय अर्थसंकल्प : भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत

  विविध विभागासाठी मुबलक निधी बेळगाव : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अर्थसंकल्पात विविध विभागांसाठी मुबलक निधी तरतूद केल्यामुळे हा एक लोकप्रिय अर्थसंकल्प ठरल्याची प्रतिक्रिया भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी दिली. शिक्षणासाठी ३,७९,५६० कोटी देऊन बजेटमध्ये 12 टक्के निधी शिक्षणासाठी राखीव ठेवला आहे. जलसंपदा विभागासाठी 22,854 कोटी रुपयांची तरतूद करून …

Read More »

5 मार्च रोजी बेळगाव मराठी साहित्य संमेलन

  बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 5 मार्च 2023 रोजी “चौथे बेळगाव मराठी साहित्य संमेलन -2023” मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी दिली. बेळगाव जिल्हा कार्यकारिणी बैठक डी. बी. पाटील …

Read More »

हेस्कॉम अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या!

  बेळगाव : शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे मात्र येथील शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. बेळगांव व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर शेती व्यवसाय करतात अनेकांचे उपजीविकेचे साधनही शेती आहे. परंतु शेतीसाठी लागणाऱ्या सोयी सुविधा शेतकऱ्यांना मिळत नाहीत. पूर्वी शेतकऱ्यांना विद्युत पुरवठ्यात व्यत्यय येत …

Read More »