Sunday , July 26 2026
Breaking News

लक्ष्मी हेब्बाळकर-रमेश जारकीहोळी समर्थक आमनेसामने

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील राजहंसगड येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या अनावरण सोहळ्यावरून श्रेयवादाचे राजकारण चांगलेच रंगले आहे.
आज राजहंसगड परिसरात काँग्रेस आमदार चन्नराज हट्टीहोळी व भाजपा नेते रमेश जारकीहोळी सामोरासमोर आले. त्यावेळी उभयतांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
मूर्ती अनावरण सोहळ्यावरून भाजपा -काँग्रेसमध्ये श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले असून ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नामुळे मूर्ती प्रतिष्ठापना होत असल्याचे ते बोलतात तर माजी आमदार संजय पाटील म्हणतात की मूर्ती प्रतिष्ठापणा माझ्या कार्यकाळात अनुदान मंजूर करून घेतले.

आज आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बळकर व बंधू आमदार चन्नराज हट्टीहोळी व भाजपा नेते रमेश जारकीहोळी, माजी आमदार संजय पाटील, किरण जाधव समोरासमोर उभे ठाकले. त्यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. रमेश जारकीहोळी यांनी चन्नराज हट्टीहोळी यांच्या कारसमोर आपली कार उभी केल्यामुळे समर्थकांमध्ये गोंधळ माजला.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *