बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवार दि. 19 रोजी सायंकाळी 5.00 वाजता रंगूबाई भोसले पॅलेस रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई मोर्चाबाबत व इतर विषयावर यावेळी चर्चा होणार आहे. म. ए. समिती पदाधिकारी, नागरिक, युवक, महिला, कार्यकर्ते …
Read More »LOCAL NEWS
अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला अधिक प्राधान्य
बेंगळुरू : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई कर्नाटक राज्याचा आर्थिक वर्ष 2023 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. अर्थसंकल्पात कमावणाऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला उच्च प्राधान्य देण्यात आले आहे. यावेळी कृषी क्षेत्राची वाढ ५.५ टक्के असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात दिली. शेतकऱ्यांसाठी विविध अनुदानेही जाहीर करण्यात …
Read More »उत्तम आरोग्य जीवनासाठी प्रेरणादायक : डॉ. आर. प्रियंका
बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात महिला संघटना, आयक्यूएसी,एन.एस.एस., रेड क्रॉस, रेडरिबन विभागातर्फे “स्त्रीची सदृढ जीवन शैली” याविषयी विशेष व्याख्यान महाविद्यालयाच्या बी.ए.,बी.कॉम., बी.एस्सी.,एम.कॉम.आणि एम.एस्सी. च्या मुलींच्या साठी आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून बेळगाव केएलई जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्री-रोग तज्ञ डॉ. …
Read More »रोटरीच्यावतीने ‘अवयव दान जनजागृती’साठी 26 तारखेला हाफ मॅरेथॉन
बेळगाव : जय भारत फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव यांच्या वतीने रविवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी अवयव दान जागृती साठी हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रोटरीचे अध्यक्ष उमेश रामगुरवाडी यांनी पत्रकार परिषद बोलताना दिली. यावेळी पुढे बोलताना रामगुरवाडी म्हणाले, 16 ते 34, 35 ते …
Read More »गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक संपन्न; मराठी भाषा दिन कार्यक्रमाचे आयोजन
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक मराठी विद्यानिकेतन येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये 27 फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरा करण्याचे ठरले. प्रबोधिनीचे उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. गुरुवर्य वि. गो. साठे प्रबोधिनीतर्फे …
Read More »गोकाक येथील व्यापाऱ्याचा मृतदेह सापडला!
गोकाक : सात दिवसांपूर्वी हत्या झालेल्या गोकाक व्यावसायिक राजू झंवर यांचा मृतदेह गुरुवारी रात्री सापडला. 6 दिवसांच्या सततच्या तपासणीनंतर पंचनायकनहट्टीजवळ मृतदेह आढळून आला. त्यात पोलिसांना यश आले आहे. रात्री 11 वाजता मृतदेह सापडला. याप्रकरणी आतापर्यंत दोन डॉक्टरांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून डॉक्टर सचिनने 10 फेब्रुवारी …
Read More »महाशिवरात्री निमित्त ब्रह्मा कुमारींची शहरात शांती सद्भावना यात्रा
बेळगाव : शहरातील प्रजापिता ईश्वरी विद्यापीठाच्या वतीने महाशिवरात्रीचा पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गांवरून ‘शिव संदेश’ शांती सद्भावना यात्रा काढण्यात आली. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या बेळगाव शाखाप्रमुख अंबिका दीदी यांनी गुरुवारी शहरातील महांतेश नगर येथील प्रजापीता ईश्वरीय विद्यापीठात शांती सद्भावना वाहन चालवले. यावेळी बोलताना दादी अंबिका म्हणाल्या, हिंदू जीवनशैली आणि …
Read More »जुना पी. बी. रोडवर आढळला अनोळखी मृतदेह
बेळगाव : जुना पी. बी. रोड येथील एका दर्ग्याजवळ अनोळखी मृतदेह आढळून आला आहे. अंदाजे मृत व्यक्तीचे वय 60 ते 65 आहे. शहापुर पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्या वृद्धाचा मृत्यू आजारपणाने किंवा अशक्तपणाने झाला असेल असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत व्यक्ती 5 फूट 4 इंच, …
Read More »महाशिवरात्री निमित्त उद्यापासून दक्षिणकाशीत विविध कार्यक्रमांचे आयोजन
बेळगाव : येथील श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या शुक्रवारपासून रात्री 12 नंतर पंचामृत अभिषेकाला सुरुवात होणार आहे. श्री कपिलेश्वर महादेव ट्रस्टच्या वतीने पहिला अभिषेक समस्त बेळगावकर नागरिकांच्या साठी करण्यात येणार आहे. त्यानंतर पहाटे पाच वाजेपर्यंत पंचामृत अभिषेक सुरू राहणार आहे. त्यानंतर रुद्राभिषेक …
Read More »येळ्ळूरमध्ये ‘गीतराधाई उत्सवशाही’ हा मराठमोळा सांस्कृतिक कार्यक्रम सोमवारी
येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने सोमवार (ता. 20) फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 8-00 वाजता परमेश्वर नगर येळ्ळूर येथील संमेलन स्थळी राधानगरी येथील ‘गीतराधाई उत्सवशाही’ हा भव्य दिव्य असा मराठमोळा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मराठमोळ्या लोकसंस्कृतीचा सुवर्णमय इतिहास दर्शविणारा हा सुंदर असा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta