Monday , April 6 2026
Breaking News

LOCAL NEWS

श्री जयतीर्थ वृंदावनाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

  बेळगाव : मेळखेड (जि. कलबुर्गी) येथील उत्तराधिकारी मठाच्या श्री जयतीर्थ वृंदावनाबद्दल श्रीरायर मठाच्या अनुयायांकडून समाजात गैरसमज पसरवण्याद्वारे लोकांना भडकवण्याचा जो प्रकार केला जात आहे त्याला तात्काळ आळा घालावा, अशी मागणी विश्वपद्म महापरिषदेतर्फे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. विश्वपद्म महापरिषदेच्या बेळगाव येथील पदाधिकारी आणि सदस्यांनी आज शुक्रवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन …

Read More »

विजेचा धक्का लागून हत्तीचा बळी

  म्हैसूर येथील धक्कादायक घटना म्हैसूर : नागरहोळ राष्ट्रीय उद्यानाअंतर्गत कर्नाटक-केरळ सीमेवरील राष्ट्रीय महामार्गावर अन्नाच्या शोधात जंगलातून नदीकडे आलेल्या हत्तीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. म्हैसूर- मानंदवाडी राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला आज पहाटे एक हत्ती कोसळलेल्या अवस्थेत आढळून आला असून, वनविभागाने घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली असता हत्तीचा मृत्यू विजेच्या धक्क्याने …

Read More »

दोदवाड जुम्मा मस्जिद कमिटीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

  बेळगाव : दोदवाड (ता. बैलहोंगल, जि. बेळगाव) गावातील ईदगाहसाठी असलेल्या 2 एकर जमिनीची नोंद सर्व्हेच्या 11 नंबर कॉलममधून काढून 9 नंबर कॉलममध्ये करावी अशी मागणी दोदवाडच्या जुम्मा मस्जिद कमिटीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दोदवाड येथील जुम्मा मस्जिद कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी सकाळी उपरोक्त मागणीची निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर केले जिल्हाधिकाऱ्यांच्या …

Read More »

बेकिनकेरे येथे शेतजमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी; 10 जण जखमी

  बेळगाव : शेतजमिनीच्या वादातून बेकिनकेरे (ता. बेळगाव) येथे गुरुवारी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यावेळी 50 जणांच्या टोळक्याने तलवारी, लाठ्या, काठ्यांनी मारहाण केल्याने दुसऱ्या गटातील 10 जण जखमी झाले. त्यामुळे गावात काहीवेळ तणावाचे वातावरण होते. केवळ मारहाणच नव्हे तर भात पेरणी केलेली शेती ट्रॅक्टरने नांगरली. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात …

Read More »

अन्नभाग्य योजना उद्यापासून सुरू

  5 किलो तांदूळ ऐवजी पैसे वाटप ; मंत्री केएच मुनिअप्पा माहिती बंगळुरू : अन्नभाग्य योजना उद्यापासून राज्यभर सुरू होणार असल्याचे अन्नमंत्री के. एच. मुनियप्पा यांनी सांगितले. बंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना मंत्री मुनियप्पा म्हणाले की, अन्नभाग्य योजना उद्यापासून सुरू होईल आणि अतिरिक्त 5 किलो तांदळाच्या बदल्यात 5 किलो मोफत तांदूळ दिला …

Read More »

जीवनविद्या मिशनतर्फे रविवारी गुरुपौर्णिमा

  बेळगाव : जीवनविद्या मिशन ज्ञान साधना केंद्र, बेळगावच्यावतीने रविवार दि. २ जुलै रोजी मराठा मंदिर येथे गुरुपौर्णिमा अर्थात कृतज्ञता दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी सद्गुरु वामनराव पै यांचे अनेक नामधारक एकत्र येणार आहेत. या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत संगीत जीवनविद्या, नृत्य, गुरुपूजन, प्रबोधन आणि श्री …

Read More »

अशोक मण्णीकेरी यांचा मृत्यू नैसर्गिक की घातपात?

  बेळगाव : उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपतहसीलदार म्हणून कार्यरत असलेले अशोक मण्णीकेरी यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मात्र हा नैसर्गिक मृत्यू नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी मण्णीकेरी कुटुंबीयांनी केली असल्याचे समजते. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, अशोक मण्णीकेरी यांना पहाटे 3 वाजता …

Read More »

शांताई विद्या आधार अंतर्गत गरजू विद्यार्थिनीला मदत

  बेळगाव : शांताई विद्या आधार योजना या माजी महापौर विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या योजनेअंतर्गत आज एका गरजू विद्यार्थिनीला दिलासा देताना तिला शैक्षणिक शुल्काची मदत करण्यात आले. माजी महापौर विजय मोरे यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या शांती विद्या आधार योजनेअंतर्गत आज गुरुवारी सामाजिक कार्यकर्ते गंगाधर …

Read More »

बेळगावात बकरी ईद सण मोठ्या उत्साहात, शांततेत

  बेळगाव : बेळगाव शहरात तसेच जिल्हाभरात मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला. शेकडो मुस्लिमबांधवानी इद -उल -अजाचे नमाज पठण करून जगाचे कल्याण आणि पावसासाठी प्रार्थना केली. मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा एक महत्वाचा सण आहे. या दिवशी या ईदचे नमाज पठण करून मुस्लिम बांधव …

Read More »

उपतहसीलदार अशोक मण्णीकेरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

  बेळगाव : उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपतहसीलदार म्हणून कार्यरत असलेले अशोक मण्णीकेरी यांचे गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 46 वर्षांचे होते. मूळचे गोकाक तालुक्यातील कोन्नूर येथील, मण्णीकेरी यांनी महसूल विभागात विविध पदांवर काम केले आणि त्यांना उपतहसीलदार पदावर बढती मिळाली. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे त्यांनी सहायक म्हणूनही त्यांनी …

Read More »