Monday , September 21 2026
Breaking News

शिवकुमार यांना ईडीची पुन्हा नोटीस

Spread the love

 

बंगळूर : अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला, तीव्र निवडणूक हालचाली आणि राजकीय दबावादरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना पुन्हा नोटीस पाठवली आहे.
नोटीसमध्ये शिवकुमार यांना २२ फेब्रुवारीपर्यंत सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना डी. के. शिवकुमार म्हणाले की, आमच्या मुलींच्या शैक्षणिक संस्थेला नोटीस मिळाली आहे. त्यांनी नोटीस पाठवून मुलीच्या शाळेची फी, परीक्षेच्या निकालाचा तपशील विचारला आहे. मी काय उत्तर द्यायचे म्हणून त्यांनी असहायता व्यक्त केली.
ही नोटीस म्हणजे विरोधी पक्षांचा डाव आहे, मी काही वेळापूर्वी ईडीच्या नोटीसला उत्तर दिले आहे. आता मला पुन्हा जावे लागेल, राजकीय दबावात काय करायचे ते सांगा, असे शिवकुमार म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *