Friday , October 18 2024
Breaking News

LOCAL NEWS

संतोष दरेकर आणि त्यांच्या टीमचे किरण जाधव यांच्याकडून प्रशंसा

बेळगाव : कोरोना महामारी हा आजार आहे. जो आपल्या आजूबाजूला इतका पसरला आहे, की आजपर्यंत पाहिली जाणारी सर्वात कठीण परिस्थिती. शिवाय, यात काही शंका नाही की बरेच लोक आणि डॉक्टर, परिचारिका आणि पोलिसांसारख्या आघाडीच्या कामगारांनी आपले आयुष्य रेषावर ठेवले असले तरीसुद्धा ते आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.आमच्याकडे असे …

Read More »

उत्तम आरोग्यासाठी सकस संतुलित आहाराची गरज : राजू घाटेगस्ती

बेळगाव : दिवसेंदिवस मानवाच्या आहार शैलीत बदलत आहे. बदलत्या युगात आपल्याला आवडते ते चटकदार आहार सेवन करण्यापेक्षा आपल्या शरीराला पोषक असा आहार घेतला पाहिजे. उत्तम आरोग्यासाठी सकस संतुलीत आहार घेण्याची गरज आहे असे आरोग्यासाठी मार्गदर्शन पर व्याख्यानात हॅपी टू हेल्प राजू रोहिनीज वेलनेस सेन्टरचे संचालक राजू घाटेगस्ती यांनी म्हटले आहे. …

Read More »

आनंदनगर रहिवासी संघटनेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

बेळगाव : आनंदनगर रहिवासी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी मल्लाप्पा कुंडेकर हे होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष कृष्णा तुळजाई व सचिव संतोष पवार उपस्थित होते.संतोष पवार यांनी सर्वांचे स्वागत केले. एस. एस. वेसणे यांनी प्रास्ताविक करून संघटनेच्या स्थापनेपासूनच्या कार्याचा आढावा घेतला. मल्लाप्पा कुंडेकर, पी. ए. पाटील, बी. एल. …

Read More »

गणेश उत्सवाची मार्गसुची लवकर जाहीर करावी

बेळगाव मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्यावतीने जिल्हा पालकमंत्र्यांना निवेदन सादर बेळगाव : महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव संदर्भातील मार्गदर्शक सूचीच्या धर्तीवर कर्नाटक सरकारने देखील उत्सवाची मार्गसुची  जाहीर करावी, अशी मागणी बेळगाव मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाने जिल्हा पालक मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांच्याकडे केली आहे. शासनाने गणेशोत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यास …

Read More »

हजाराहून अधिक रुग्णांना वाचवणाऱ्या डॉक्‍टरचा किरण जाधव यांच्याकडून सत्कार

बेळगाव : कोरोनाविषाणूच्या फैलावामुळे कोव्हिड-19ची बाधा झालेल्या रुग्णांना अव्याहतपणे सेवा देणाऱ्या डॉ. सतिश चौलीगर यांचा सत्कार भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चा आघाडीचे राज्य सचिव किरण जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गजेश नंदगडकर आणि अभिषेक वेर्णेकर हेही उपस्थित होते.होमिओपाथीक तज्ञ असलेले डॉ. चौलीगर हे बेळगावच्या शनिवार खुट भागात नवजीवन हॉस्पिटलचे …

Read More »

तहसीलदार कार्यालयातून गाडी चोरी

बेळगाव : बेळगाव रिसालदार गल्ली येथील तहसीलदार कार्यालयाच्या पार्किंग इमारतीच्या जवळ पार्किंग केलेली स्प्लेंडर हिरो होंडा गाडी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना बुधवारी दिनांक 7/7/ 2021 रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडली आहे. याबाबत हिरो होंडा स्प्लेंडर गाडीचे मालक सुनील जाधव यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध खडेबाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. …

Read More »

गतिमंद महिलेची निराधार केंद्रात रवानगी

बेळगाव : वडगाव परिसरात सापडलेल्या निराधार गतिमंद महिलेची मंगाईदेवी युवक मंडळाचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव यांच्या पुढाकारातून जुने बेळगाव येथील निराधार केंद्रात रवानगी करण्यात आली. गेल्या वीस दिवसांपासून मंगाई मंदिर वडगाव या परिसरात यल्लूबाई दंडगल नावाची गतिमंद महिला फिरत होती. मंगाईदेवी युवक मंडळाचे कार्यकर्ते युवराज पाटील व योगेश …

Read More »

शांताई वृद्धाश्रमात लसीकरण

बेळगाव : कोरोना काळात योगदान दिलेल्या आशा कार्यकर्त्या आणि आरोग्याधिकारी यांचा सत्कार शांताई वृद्धाश्रमात करण्यात आला. माजी महापौर विजय मोरे यांनी सर्व कोविड वॉरियरांचा सत्कार केला. या जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ आणि तालुका अधिकारी डॉ. बाळकृष्ण तुक्कार, मनपा आरोग्याधिकारी संजीव डूमगोळ, टी एच ओ शिवानंद मास्तीहोळी, डॉ. शिवस्वामी एम …

Read More »

जिव्हाळा फाऊंडेशनतर्फे निराधार गरजूंना किराणा साहित्याचे वितरण

बेळगाव : जिव्हाळा फाऊंडेशनतर्फे जुने बेळगाव येथील महानगरपालिकेच्या निराधार केंद्रातील गरजूंना किराणा साहित्याचे वितरण करण्यात आले.लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना त्रास सोसावा लागत आहे. तसाच त्रास निराधारानाही सोसावा लागत आहे, याची दखल जिव्हाळा फाऊंडेशनने घेऊन येथील निवारा केंद्रातील 48 गरजूंना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. फाऊंडेशनच्या हाकेला साद घालत अमित पाटील यांनी …

Read More »

कित्तूर ऐतिहासिक स्थळाच्या विकासासाठी 50 कोटी

10 कोटीच्या कृती आराखड्यास मंजूरी : 46 वारसा स्थळांच्या विकासास मान्यता बंगळूरू : मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी मंगळवारी नाडप्रभू केम्पेगौडा यांच्या स्मरणार्थ 46 वारसा स्थळांच्या विकासास मान्यता दिली. 223 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. येडियुराप्पा यांच्या अध्यक्षतेखालील केम्पेगौडा विकास मंडळाच्या आढावा बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी …

Read More »