Thursday , November 21 2024
Breaking News

LOCAL NEWS

अलतगा येथील दुर्घटनेतील “त्या’ युवकाचा मृतदेह सापडला

  बेळगाव : अलतगाहून कंग्राळी (खुर्द)कडे कटिंग करायला दुचाकीवरून जात असताना दुचाकी नाल्यात कोसळून झालेल्या अपघातानंतर नाल्याच्या पाण्यातून वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह शोधून काढण्यात एसडीआरएफ टीमला यश आले आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास “त्या” युवकाचा मृतदेह सापडला. शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अलतगा युवक ओंकार पाटील हा वाहून गेला होता रविवारी …

Read More »

येत्या ७२ तासांत मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

  बंगळुरू : यंदा पावसाने भीषण पूरस्थिती निर्माण केली असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी हवामान खात्याने पुढील ७२ तास ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पावसाळा संपायला अजून २ महिने बाकी आहेत. म्हणजेच सप्टेंबर २०२४ पर्यंत मान्सून पाऊस पडेल. असे असले तरी अवघ्या २ महिन्यात पावसाच्या …

Read More »

अलतगाजवळ कालव्यात दुचाकी वाहून गेली; एक बचावला तर दुसरा बेपत्ता..

  बेळगाव : अलतगा गावातून दुचाकीवरून शेजारील कंग्राळी गावात कटिंग करण्यासाठी गेलेले दोन तरुण अलतगाजवळ कालव्यात पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याची घटना आज सायंकाळी घडली असून एक बचावला आहे तर दुसरा तरुण बेपत्ता झाल्याचे समजते. अलतगा गावातील ओंकार पाटील व ज्योतिनाथ पाटील नावाचे दोन तरुण कंग्राळी येथून त्यांच्या मूळ गावी अलतगा …

Read More »

मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्याविरोधात भाजप सुडाचे राजकारण करत आहे : मंत्री दिनेश गुंडूराव

  बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात बंड पुकारल्याने भाजप सरकार सिद्धरामय्यांच्या विरोधात सूडाचे राजकारण करत आहे. त्यांनी मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात आवाज उठवला असून यामुळे सिध्दरामय्यांचे केंद्रासमोर आव्हान उभे आहे, अशी टीका आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी केली. आज बेळगावात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दिनेश गुंडूराव पुढे …

Read More »

आम. अभय पाटील यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश : सुजित मुळगुंद

  बेळगाव : भ्रष्टाचार, बेकायदेशीर भूसंपादन आणि वारसाहक्क या आरोपाखाली बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक सरकार आणि लोकायुक्तांना दिले आहेत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सुजीत मुळगुंद यांनी दिली आहे. शनिवारी बेळगावमध्ये बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या १२ वर्षांपूर्वी …

Read More »

योगा-बुद्धिबळ स्पर्धेत कामधेनू शालेय मुलांचे सुयश

  बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने घेण्यात आलेल्या आणि श्री बनशंकरी एज्युकेशन ट्रस्ट संचालित तात्यासाहेब मुसळे कन्नड प्राथमिक व माध्यमिक शाळा आयोजित प्राथमिक विभागीय वडगाव-खासबाग क्लस्टर विभागाच्या योगा आणि बुद्धिबळ स्पर्धेत येथील कामधेनू शाळेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. या स्पर्धेत विविध शालेय विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. बुद्धिबळ स्पर्धेत 14 वर्षांखालील वयोगटात …

Read More »

घर कोसळून जखमी झालेल्या महिलेच्या प्रकृतीची मंत्री हेब्बाळकर यांच्याकडून विचारपूस

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी गावात सततच्या पावसामुळे घर कोसळून एक महिला जखमी झाली असून मंत्री हेब्बाळकर यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. घराची भिंत कोसळून झालेल्या या घटनेत पार्वती होदेप्पा हुदली (३१) ही महिला जखमी झाली आहे. तिच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी …

Read More »

मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा उद्या कौतुक सोहळा

  बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे मराठा समाजातील यंदाच्या दहावी व बारावी परीक्षेत 90 टक्के गुण घेतलेल्या 122 गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा रविवार दि. 4 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. रेल्वे ओव्हर ब्रिजजवलील मराठा मंदिर येथे सकाळी 10.30 वा. होणाऱ्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे या नात्याने शिवाजी विद्यापीठाचे …

Read More »

भाजप-धजद पदयात्रेला परवानगी : जी परमेश्वर

  राज्यपालांच्या निर्णयाविरोधात कायदेशीर लढा बंगळूर : मुख्यत: मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात गाजत असलेल्या मुडा घोटाळ्याशी संबंधित लढा अधिक तीव्र करण्यासाठी विरोधी पक्ष भाजप आणि धजद आज (ता. ३) बंगळूर-म्हैसूर पदयात्रेला सुरवात करणार आहेत. दरम्यान, पदयात्रेला सरकारने परवानगी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी शुक्रवारी सांगितले. आज बंगळुरमध्ये …

Read More »

मुडा घोटाळा : सरकार विरुध्द राजभवन संघर्ष पेटण्याची शक्यता

  नोटीसला घाबरत नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा बंगळूर : राज्यपालांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मुडा घोटाळा प्रकरणी नोटीस बजावली असून उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील काँग्रेस सरकार आणि राजभवन यांच्यात संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घडामोडींदरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही राज्यपालांच्या कारणे दाखवा नोटीसला उत्तर दिल्याने आगामी काळात हा प्रकार …

Read More »