Monday , December 23 2024
Breaking News

LOCAL NEWS

जायंट्स मेनच्यावतीने पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

बेळगाव : कोरोनामुळे जनतेला ऑक्सिजनचे महत्त्व कळाले असून गेल्या वर्षभरात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत.नैसर्गिकरित्या प्राणवायू तयार करण्यासाठी वृक्ष लागवड करणे अत्यंत गरजेचे असून दरवर्षी जायंट्सच्या माध्यमातून हे कार्य चालू असून ते अभिनंदनीय आहे, असे उदगार दुग्ध व्यावसायिक शरद पाटील यांनी काढले.यावर्षी जायंट्स मेनच्यावतीने मार्कंडेय नगर येथे …

Read More »

जागतिक रक्तदान दिनानिमित्त रेड क्रॉस सोसायटीतर्फे रक्तदात्यांचा सन्मान

बेळगाव : जागतिक रक्तदान दिनानिमित्त भारतीय रेड क्रॉस सोसायटीतर्फे आज सोमवारी सकाळी शहरातील आत्तापर्यंत सर्वाधिक वेळा रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला. सिव्हिल अर्थात बीम्स हॉस्पिटलच्या ब्लड बँकेच्या हॉलमध्ये सदर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. व्ही. …

Read More »

शंभर गरीब गरजूंना प्रोत्साह फाऊंडेशनवतीने जीवनावश्यक साहित्य वाटप

बेळगाव : कोरोना काळात सर्वसामान्य जनतेला विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. चर्मकार समाजातील गरिबांवरही मोठे संकट कोसळले आहे अशा काळात समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांगीण प्रयत्न आवश्यक असल्याचे मत मंडल पोलीस निरीक्षक संतोष कुमार चंदावली यांनी व्यक्त केले. प्रोत्साह फाउंडेशनच्यावतीने आज सोमवारी सकाळी युनियन जिमखाना येथे चर्मकार समाजातील शंभर गरीब गरजूंना …

Read More »

घुमटमाळ मारुती मंदिरातर्फे आर. के. कुट्रे यांना श्रद्धांजली

बेळगाव : घुमटमाळ मारुती मंदिर हिंदवाडीचे माजी अध्यक्ष व विद्यमान ट्रस्टी, माजी प्राचार्य आर. के. कुट्रे यांचे गेल्या महिन्यात निधन झाले. त्यानिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्टच्यावतीने बी. के. बांडगी सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. आज या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री. अनंत लाड हे होते.प्रारंभी …

Read More »

बेकायदेशीर स्थलांतरितांना कर्नाटकातून बाहेर पाठवणार: मुख्यमंत्री

बेंगळूर : रविवारी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशमधील बेकायदेशीर स्थलांतरितांना कर्नाटकच्या बाहेर पाठवणार असल्याचे सांगितले. रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना राज्यातील अशा लोकांना ओळखण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी राज्यातील जागा कमी असलेल्या लोकांना निवासी भूखंड देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू असेही …

Read More »

चर्मकार समाजातील गरीब गरजूंना प्रोत्साहन फाऊंडेशन देणार मदतीचा हात

बेळगाव : चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रोत्साहन फाउंडेशनच्या वतीने समाजातील गरीब गरजूंना मदत देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. प्रोत्साहन फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक गंगाप्पा होनगल सभागृहात नुकतीच पार पडली. यावेळी उपस्थित सर्व सदस्यांनी कोरोना काळात चर्मकार समाजातील गरिबांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे संत रोहिदास हरळय्या समाजातील गरीब …

Read More »

ऑनलाईन, ऑफलाईन अध्ययन मार्गसूची जाहीर; एक जुलैपासून शैक्षणिक वर्षारंभ

बंगळूरू : सध्याचे शैक्षणिक वर्ष (२०२१-२२) १ जुलैपासून सुरू होणार असून सार्वजनिक शिक्षण विभागाने पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भौतिक (फिजीकल) वर्गाऐवजी ऑनलाईन व ऑफलाईनमध्ये अभ्यासक्रम शिकविणार्‍या नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.मागील वर्षाप्रमाणे, १६६२ व्हिडिओ पाठ संवेदना कार्यक्रमांतर्गत चंदन वाहीनीवर शिकविले जातील. एफएम रेडिओवरही ऑडिओ धड्यांचे प्रसारण होईल.पहिली ते दहावीच्या …

Read More »

हिंडलगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आठ दिवस कडक लॉकडाऊन

बेळगाव : हिंडलगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन रविवार 13 जूनपासून पुढील 8 दिवस कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवार 19 जूनपर्यंत लॉकडाऊनच्या काळात किराणा दुकाने सुध्दा बंद राहणार आहेत. हिंडलगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व गावात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या नियमानुसार आणि …

Read More »

पोलीस दलातील ‘रेम्बो’ हरपला!

बेळगाव : अत्यंत गुंतागुंतीचे खून, हत्याकांड, चोरी, दरोडे अशा गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली. गुन्हेगारांना गजाआड करण्यात त्याने पोलिसांना मोठी मदत केली. खऱ्या अर्थाने राज्याची शान आणि पोलिसांचा मानबिंदू असलेल्या रॅम्बोने शनिवारी जगाचा निरोप घेतला. त्याला निरोप देताना कर्तव्यकठोर पोलिसांचेही डोळे पाणावले. बेळगाव पोलिसांच्या श्वानदलात गेल्या १२ …

Read More »

जिव्हाळा संस्थेतर्फे गरजूंना रेशन किटचे वाटप

बेळगाव : जिव्हाळा ही संस्था महिलांनी स्थापन केलेली आहे त्यामुळे संस्थेमध्ये बहुतांश महिलांचा सहभाग आहे. या संस्थेतर्फे मोफत रुग्णवाहिका, शववाहिका, शवदहन सेवा, स्वच्छता अभियान, अश्या विविध सेवा पुरविल्या जातात.आज जिव्हाळा संस्थेतर्फे गरजूंना रेशन किटचे वितरण करण्याचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून संस्थेला हातभार लावलेल्या देणगीदारांना आमंत्रित करण्यात आले …

Read More »