बेळगाव : बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला एक भव्य परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रा पाठोपाठ बेळगाव सीमाभागात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या हर्षोल्सासात आणि उत्साहात साजरा केला जातो. बेळगावच्या भव्य सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा पुढे नेण्याचे काम एका विशिष्ट पूर्ण रीतीने बेळगाव उपनगरातील बॅरिस्टर नाथ पै चौक शहापूर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केले आहे. यावर्षी …
Read More »LOCAL NEWS
मराठा बँकेची ८३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
बेळगाव : मराठा बँकेची 83 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मराठा मंदिर येथे कै. अर्जुनराव गोविंदराव घोरपडे सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. प्रारंभी बँकेचे चेअरमन श्री. बाळाराम पाटील यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत केले व प्रास्ताविक भाषणात स्पर्धात्मक बँकिंग क्षेत्रामध्ये आपल्या बँकेने केलेल्या प्रगतीबाबत उपस्थित सभासदांना माहिती दिली. तसेच 2024-2025 च्या …
Read More »प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या महारक्तदानाला शेकडो रक्तदात्यांचा प्रतिसाद
बेळगाव : देश विदेशात सामाजिक एकता, शांतता आणि विश्वबंधुत्वासाठी कार्यरत असलेल्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या बेळगाव युनिट वतीने ब्रह्माकुमारी दादी प्रकाशमणी यांच्या स्मृतिदिनानिमित्त 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान बेळगावात सलग तीन दिवस महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सलग तीन दिवस चाललेल्या या महा रक्तदान शिबिरात बेळगावातील शेकडो …
Read More »सीमाभागातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी सवलतींचा लाभ घ्यावा
बेळगाव : सीमाभागातील विद्यार्थ्यांनी माफक शुल्कात उच्च शिक्षणासाठी विविध अभ्यासक्रमात देण्यात येणाऱ्या सवलतींचा लाभ घ्यावा असे आवाहन कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव विनय शिंदे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र यांच्यावतीने राबविण्यात येणा-या विविध अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी म.ए. समितीतर्फे सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ओरिएंटल हायस्कूल …
Read More »के-सेट परीक्षेतून मराठीला वगळले; उद्या युवा समिती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार
बेळगाव : पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक असलेल्या, कर्नाटक परीक्षा प्राधिकारण मार्फत घेण्यात येणाऱ्या के-सेट परीक्षेतून मराठी विषयाला वगळण्यात आले आहे, त्या संदर्भात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने सोमवार दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी बेळगाव यांना निवेदन देण्यात येणार आहे तरी सर्व पदाधिकारी आणि मराठी …
Read More »बेळगाव ग्रामीण भागातील अनेक गावात आज वीज पुरवठा खंडित
बेळगाव : दुरुस्तीच्या कारणास्तव विविध भागात आज रविवार दि. 24 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे हेस्कॉम ग्रामीण विभागाने कळविले आहे. मुचंडी, अष्टे, कॅम्बेल, मारिहाळ, करडीगुद्दी, पंतबाळेकुंद्री, बाळेकुंद्री, होन्निहाळ, माविनकट्टी, तारिहाळ, चंदन होसूर, एमईएस सांबरा, मुतगा, सुळेभावी, पंतनगर, मोदगा, यद्दलभावीहट्टी, खणगाव, चंदूर, चंदगड, गणिकोप्प, …
Read More »गौंडवाडच्या सतीश पाटील खून प्रकरणी पाच आरोपींना जन्मठेप
बेळगाव : मंदिराच्या जागेच्या वादातून खून झालेल्या बेळगाव तालुक्यातील गौंडवाड येथील सतीश पाटील यांच्या कुटुंबीयांना सुमारे तीन वर्षांनी न्याय मिळाला आहे. या प्रकरणात ९ पैकी ५ आरोपींना जन्मठेप, तर ४ जणांना कठोर शिक्षा सुनावण्यात आली असून, एकूण १३ लाख ७५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. बेळगाव तालुक्यातील गौंडवाड …
Read More »शाहुनगर येथील इटर्निया कंपौंड व्हेंचर्स नामक कंपनीकडून 89 लाखांची फसवणूक; चौघांविरुद्ध तक्रार
बेळगाव : ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा देण्याचे सांगून सावजांना ठकवण्याचे सायबर गुन्हेगारांचे प्रकार सुरुच आहेत. बेळगाव येथेही एका कंपनीने गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात गंडविल्याचे उघडकीस आले असून यासंबंधी फशी पडलेल्या गुंतवणूकदारांनी मदतीसाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे. सुमारे 89 लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. फसवणुकीच्या या …
Read More »मराठा बँकेला 2 कोटी 48 लाख नफा; उद्या सर्वसाधारण सभा
बेळगाव : मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेने 31 मार्च 2025 अखेर 2 कोटी 48 लाख नफा मिळविला आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन श्री. बाळाराम पाटील व संचालकांनी पत्रकार परिषदेत दिली. बँकेची 83 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 24 ऑगष्ट 2025 रोजी सकाळी 11.00 वा. मराठा मंदीर, खानापूर रोड, बेळगांव येथील “अर्जुनराव …
Read More »जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत एन. के. एज्युकेशन सोसायटीचा विद्यार्थी अनिश ए. कोरे याचे यश
बेळगाव : जिल्हा प्री-युनिव्हर्सिटी शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत एन. के. एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अनिश ए. कोरे या विद्यार्थ्याने ५०, १०० व २०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत प्रथम क्रमांक मिळविला. तीनही गटांमध्ये मिळवलेले यश अनिशसाठी तसेच संस्थेसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta