Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

पावसामुळे झालेल्या समस्यांचा आमदार अभय पाटील यांनी घेतला आढावा

बेळगाव : बेळगावात गुरुवारी सायंकाळपासून झालेल्या जोरदार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पावसाने सखल भागात अनेक ठिकाणी नुकसानही झाले आहे. बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी आज सकाळी अशा भागांना भेट देऊन पाहणी केली. बेळगाव शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी कालपासून पावसाने चांगलेच झोडपले आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे …

Read More »

बेळगाव जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन

बेळगाव : बेळगाव शहरासह जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन झाले आहे. बेळगावात तर काल सायंकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावून शहरवासीयांना चिंब करून सोडले आहे. बेळगाव शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुरुवारी सायंकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरात गुरुवारी रात्रभर पावसाने अक्षरशः झोडपून काढले. पावसामुळे शहरातील व्यवसाय गुरुवारी सायंकाळी लवकरच बंद करण्यात …

Read More »

कावळेवाडी वाचनालयाला विविध उपक्रमासाठी महाराष्ट्र शासनाचे अनुदान प्राप्त

बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालयाच्या विधायक विविध उपक्रमासाठी राज्य मराठी विकास संस्था मुंबईकडून ६० हजार रुपये अनुदान प्राप्त झाले. यापूर्वी ३७ हजार रुपये मिळाले होते. उर्वरित २४ हजार रुपये जमा झाले आहेत. अध्यक्ष वाय. पी. नाईक यांच्या मार्गदर्शनतून गेली चार वर्षे विविध उपक्रम सर्वांच्या …

Read More »

तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवीन आयुष्य जगावे : उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी. वीरप्पा

बेळगाव : तुरुंगातून शिक्षा भोगून सुटका झालेल्या कैद्यांनी पुन्हा नव्या आयुष्याची सुरुवात करावी आणि नव्या आयुष्यात समाजासमोर आदर्श बनावे, असे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि कायदा सेवा प्राधिकरणाचे राज्याध्यक्ष बी. वीरप्पा यांनी केले. राज्यातील विविध तुरुंगांना भेट देऊन तेथील मूलभूत सुविधांची पाहणी करताना न्यायाधीश बी. वीरप्पा यांनी हि प्रतिक्रिया व्यक्त …

Read More »

गावात गटारी, रस्ते सुविधा पुरवा

बसवणकुडची ग्रामस्थांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बसवणकुडची गावात विविध मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात, तसेच शेतकर्‍यांना शेतात जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करून द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी बसवणकुडची ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले. बसवणकुडची गावात रस्ते, गटारी यासह विविध सुविधांचा अभाव आहे. बसवणकुडची तसेच मनपा व्याप्तीत येणार्‍या परिसराचा विकास झाला नाही. …

Read More »

कर्नाटकाचा दहावीचा निकाल 85.63 टक्के

बेळगाव, चिक्कोडी जिल्हा ’अ’ श्रेणीत, उत्तीर्णतेत मुलींचे प्रमाण अधिक बंगळूर : कर्नाटक माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाने आज दहावी (एसएसएलसी) बोर्डाचा निकाल जाहीर केला. यावर्षी एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 85.63 टक्के आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण यावर्षीही मुलांपेक्षा अधिक (90.29 टक्के) आहे, तर मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 81.30 टक्के आहे. यावेळी निकालाच्या टक्केवारीनुसार जिल्ह्यांची …

Read More »

वीरशैव महासभेचे लिंगायत महासभेत रूपांतर करण्यास विरोध

बेळगाव : अखिल भारतीय वीरशैव महासभेचे नाव अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभा असे करण्यामुळे जनतेमध्ये गोंधळ निर्माण होत असून अखिल भारतीय जागतिक लिंगायत महासभा याला विरोध करत असल्याची प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष बसवराज रोट्टी यांनी व्यक्त केली. बेळगावमधील विश्वगुरू कॉम्प्लेक्स मधील जागतिक लिंगायत महासभेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत …

Read More »

एसएसएलसी : बेळगाव जिल्हा राज्यात चौथा

6 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण बेळगाव : राज्यभरात घेण्यात आलेल्या एसएसएलसी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून, एकूण 145 विद्यार्थ्यांनी 625 पैकी 625 गुण मिळवून विक्रम प्रस्थापित केला आहे. बेळगाव जिल्ह्यात 6 विद्यार्थ्यानी 625 पैकी 625 गुण मिळवून स्पृहणीय यश मिळवले आहे. निकालात बेळगाव जिल्हा राज्यात चौथा आला आहे. …

Read More »

दहावीच्या परीक्षेत बेळगावचा हेरवाडकर स्कूलचा विद्यार्थी अमोघ कौशिक राज्यात प्रथम

बेळगाव : यंदाच्या एसएसएलसी (दहावीच्या) परीक्षेत भाग्यनगर चौथा क्रॉस येथील अमोघ नागसुरेश कौशिक हा विद्यार्थी सर्वाधिक 100% गुण संपादन करत बेळगाव शहरात प्रथम येण्याबरोबर राज्यात प्रथम आला आहे. शहरातील टिळकवाडी येथील एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलचा विद्यार्थी असणाऱ्या अमोघ कौशिक याने दहावीच्या परीक्षेत 625 पैकी 625 गुण संपादन केल्याने यंदाच्या दहावीच्या …

Read More »

दहावी परीक्षेत सहना रायर राज्यात टॉप

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील एका किराणा दुकानदाराच्या मुलीने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा सन्मान मिळाला आहे. सहना महांतेश रायर असे या मुलीचे नांव असून तिने परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवले आहेत. राज्यभरातील एसएसएलसी अर्थात दहावीचा निकाल आज गुरुवारी दुपारी जाहीर झाला. यावेळी राज्यभरातील एकूण 145 विद्यार्थ्यांनी 625 पैकी …

Read More »