Saturday , April 18 2026
Breaking News

पावसामुळे झालेल्या समस्यांचा आमदार अभय पाटील यांनी घेतला आढावा

Spread the love

बेळगाव : बेळगावात गुरुवारी सायंकाळपासून झालेल्या जोरदार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पावसाने सखल भागात अनेक ठिकाणी नुकसानही झाले आहे. बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी आज सकाळी अशा भागांना भेट देऊन पाहणी केली.
बेळगाव शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी कालपासून पावसाने चांगलेच झोडपले आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर आ. अभय पाटील यांनी आज, शुक्रवारी पहाटे 4.30 वाजल्यापासूनच सिटी राऊंड सुरु करून पावसाने नुकसानग्रस्त भागांना भेटी दिल्या. अनेक घरांत पावसाचे पाणी घुसून रहिवाशांना राहणे कठीण झाले आहे. त्यांची आ. पाटील यांनी विचारपूस केली. या संदर्भात माहिती देताना आ. अभय पाटील म्हणाले, गेल्या वर्षी करिअप्पा कॉलनी, एसटी कॉलनी, मराठा कॉलनी, गांधी कॉलनी, शास्त्री नगर, जक्केरी होंडा, साई नेकार कॉलनी आणि महाद्वार रोड परिसरात फिरून पाहणी केली आहे.
यावेळी आ. अभय पाटील यांच्यासह नगरसेवक नंदू मिरजकर, राजू भातकांडे, स्थानिक नेते आनंद चव्हाण, जयंत जाधव, भागवत, नितीन गोडसे यांच्यासह पालिका अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाबाबत जागरूकता तसेच 33% महिलांना आरक्षण हेच भाजपचे ध्येय : माजी खासदार मंगला अंगडी

Spread the love  बेळगाव : नारी शक्ती फोरमच्या वतीने “नारी शक्ती वंदन अधिनियम” निमित्त महिलांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *