Monday , December 23 2024
Breaking News

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आज प्रारंभ

Spread the love

 

अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता

बंगळूर : लोकसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर राज्य विधिमंडळाचे अधिवेशन उद्या (ता. १२) पासून सुरू होणार असून, लोकसभा निवडणुकीवर राजकीय पक्षांचे लक्ष लागून असल्याने हे विधिमंडळ अधिवेशन राजकीय उलथापालथीचे व्यासपीठ ठरणार आहे. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकावर आरोप-प्रत्यारोप करण्याची शक्यता आहे. दुष्काळाच्या व्यवस्थापनात सरकारचे अपयश, हमी योजनांच्या अंमलबजावणीतील गोंधळ, विकासकामांसाठी निधीची कमतरता, राज्याची ढासळलेली आर्थिक परिस्थिती, कंत्राटदारांकडून कमिशन वसुली, अल्पसंख्याकांशी पक्षपात, असे अनेक मुद्दे अधिवेशनात वादाचे मुद्दे ठरण्याची शक्यता असून अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.
विरोधी पक्ष भाजप आणि धजद यांनी युती केली असल्याने दोन्ही पक्ष एकत्र येऊन सरकारविरोधात गदारोळ घालण्याची शक्यता आहे. त्याला तोंड देण्यासाठी काँग्रेसनेही आपली स्वतंत्र रणनिती तयार केली आहे.
राज्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. दुष्काळी व्यवस्थापनातील त्रुटी सभागृहात मांडून सरकारला लाजवण्यास विरोधी पक्ष सज्ज झाले आहेत. त्याला समर्थपणे तोंड देण्याची तयारी सत्ताधारी काँग्रेसने केली आहे. सभागृहातील संभाव्य संघर्षाबाबत उत्सुकता निर्माण केली आहे.
केंद्र सरकारच्या अनुदानात भेदभाव आणि दुष्काळ निवारणाच्या कामांना अनुदान न देणाऱ्या केंद्राच्या हालचालींवर आवाज उठवून विरोधकांना शांत करण्यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज झाला आहे.
केंद्र सरकारचे सापत्नभावनेचे धोरण, कराचा वाटा कमी करणे यासह राज्यावर होत असलेल्या अन्यायाकडे लक्ष वेधून विरोधकांची तोंडे बंद करण्याची रणनीती काँग्रेसने आखली असून, त्या बदल्यात काँग्रेसला टक्कर देण्यासाठी भाजप सज्ज झाला आहे. यूपीए सरकार आणि मोदी सरकारच्या अनुदान वितरणाची आकडेवारी मांडून कॉंग्रेसला अडचणीत आनण्याचा त्यांचा प्रयत्न रहाणार आहे.
लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने या अधिवेशनात काँग्रेस आणि विरोधी पक्ष राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करणार असून हे अधिवेशन राजकीय उलथापालथीचे व्यासपीठ ठरणार आहे.
राज्यपालांचे अभिभाषण
राज्यपाल थावरचंद गेलहोत विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा आणि विधान परिषदेच्या संयुक्त अधिवेशनात सदस्यांना उद्या (ता.१२) संबोधित करतील.
राज्यपालांनी प्रत्येक वर्षाच्या पहिल्या अधिवेशनात दोन्ही सभागृहांना संबोधित करण्याची प्रथा आहे. त्यानुसार या वर्षातील पहिले अधिवेशन असलेल्या या अधिवेशनात राज्यपाल उद्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना संबोधित करणार आहेत. राज्यपाल आपल्या भाषणात सरकारची दूरदृष्टी, उद्दिष्टे, दिशा नमूद करणे अपेक्षित आहे.
१६ ला अर्थसंकल्प
या अधिवेशनात मुख्यमंत्री सिद्धरामय्या २०२४-२५ वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. १६ तारखेला ते विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.अर्थमंत्री म्हणून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विक्रमी १४ अर्थसंकल्प सादर केले असून उद्याचा अर्थसंकल्प हा त्यांचा १५ वा अर्थसंकल्प आहे.
राज्याच्या इतिहासात मुख्यमंत्री सिद्धरामय्या सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री ठरणार आहेत. याआधी अर्थमंत्री असलेले माजी मुख्यमंत्री दिवंगत रामकृष्ण हेगडे यांनी १३ अर्थसंकल्प सादर केले होते.

About Belgaum Varta

Check Also

अभियंता अतुलकडून निकीता मागत होती 80 हजार रुपये मेंटेनन्स

Spread the love  बेंगळुरू : अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांची पत्नी निकिता सिंघानिया हिच्यासह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *