मनोज कुमार मीना; मतदान केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था
बंगळूर : निवडणूक आयोगाने कर्नाटक राज्यातील १४ लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी होणाऱ्या मतदानाची अंतिम तयारी पूर्ण केली आहे. मतदान शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे, यावेळी राज्यात १,८३२ विशेष मतदान केंद्रांच्या स्थापनेकडे लक्ष वेधले आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार मीना यांनी दिली.
शहरातील नृपतुंगा मार्ग येथे आयोगाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, २६ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाची अंतिम तयारी करण्यात आली आहे. ७ मे रोजी होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी राज्यातील उमेदवार आणि मतदारांना प्रचारासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एकूण १,१२० सखी मतदान केंद्रे जाहीर करण्यात आली आहेत.
ते म्हणाले की, सुरक्षा रक्षक, ‘ड’ श्रेणीचे कर्मचारी सर्व महिला असतील त्याचप्रमाणे प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी ‘अपंगांसाठी विशेष मतदान केंद्र’ स्थापन करण्यात आले असून, तेथे अपंग अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले जातील. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक युवा मतदान केंद्र उघडण्यात येणार असून, सर्व मतदारांमध्ये निवडणूक आणि मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तरुण अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले जातील, प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी मिशन-आधारित मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.
म्हैसूर, चामराजनगर, कोडगु, दक्षिण कन्नड, उडुपी, हसन आणि शिमोगा जिल्ह्यांमध्ये येथील मतदान केंद्रांवर अनुसूचित जमातीच्या लोकांना आकर्षित करण्यासाठी आदिवासी लोकांची सांस्कृतिक विविधता प्रतिबिंबित करण्यासाठी ४० विशेष मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
उडुपी – चिकमंगळूर, हसन, दक्षिण कन्नड, चित्रदुर्ग (एससी), तुमकूर, मंड्या, म्हैसूर, चामराजनगर (एससी), बंगळुर ग्रामीण, बंगळुर उत्तर, बंगळुर दक्षिण, बंगळूर मध्य, चिक्कबळ्ळापूर, कोलार (एससी) मतदारसंघ पहिल्या टप्प्यात, तर दुसऱ्या टप्प्यात चिक्कोडी, बेळगाव, बागलकोट, विजापूर (एससी), गुलबर्गा (एसटी), रायचूर (एसटी), बिदर, कोप्पळ, बेळ्ळारी (एसटी), हावेरी, धारवाड, उत्तर कन्नड, दावणगेरे, शिमोगा येथे निवडणुका होणार आहेत. या मतदारसंघात एकूण 2,88,19,342 मतदार आहेत. यापैकी १,४४,२८,०९९ पुरुष, १,४३,८८,१७६ महिला आणि ३,०६७ तृतीय पंथीय मतदार आहेत.
मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, वीज, फर्निचर, वेटिंग रूम, पुरुष व महिला प्रसाधनगृह, रॅपिड फोर्स २ असावेत, अशी सूचना करण्यात आली आहे.
शुक्रवारी पहिल्या टप्प्यात मतदान होत असलेल्या १४ मतदारसंघातील ३०,६०२ मतदान केंद्रांवर चार लाख मतदान अधिकारी कर्तव्यावर असतील. या मतदान केंद्रांवर सुरक्षेसाठी पाच हजार सूक्ष्म निरीक्षक, ५० हजार नागरी पोलीस कर्मचारी, ६५ निमलष्करी दल आणि इतर राज्यांचे सशस्त्र पोलीस दल देखील तैनात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बंगळुर ग्रामीण लोकसभा मतदारसंघातील सर्व २,८२९ मतदान केंद्र १०० टक्के वेबकास्ट असतील. निवडणूक अधिकारी आणि निरीक्षकांच्या विनंतीनुसार या मतदारसंघात दुप्पट निमलष्करी दल तैनात करण्यात येणार असून, २२ एप्रिलपासून मतदारसंघात सात निमलष्करी दलांना पाचारण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.