Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

वर्षभरात २५ हजार कि.मी.चे राष्ट्रीय महामार्ग बांधणार

रस्ते वाहतुकीसंदर्भात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा नवी दिल्ली : दोन वर्ष करोनामुळे आर्थिक फटका सहन करणाऱ्या देशासाठी यंदाच्या अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. करोनाची लाट ओसरत असताना अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आणण्याचं मोठं आव्हान या वर्षी देशासमोर असणार आहे. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेल्या इतर अनेक घोषणांसोबत देशात पायाभूत सुविधांमध्ये …

Read More »

गुंजी येथे हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न

खानापूर : गुंजी येथे हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न झाला. भारतीय संस्कृती ही प्राचीन असून यामध्ये स्त्रीला घरची लक्ष्मी मानले जाते. संस्कृती टिकविणे हे केवळ तिच्याच हातात आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सरिता पाटील यांनी केले. गुंजी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या हळदीकुंकू समारंभात त्या …

Read More »

महिला आघाडीतर्फे हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात

बेळगाव : महिला आघाडीतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे हळदी-कुंकू कार्यक्रम महिला आघाडीच्या शनिवार खुट हॉलमध्ये कोविड नियमांचे पालन करून उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर श्रीनिवास जाधव आणि डॉक्टर नाझीब कोतवाल उपस्थित होत्या. या कार्यक्रमाची सुरुवात अर्चना देसाई यांच्या ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फोटो पूजन आणि …

Read More »