चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : आमदार राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वेणूगोपाल पतसंस्थेमार्फत कानुर आरोग्य केंद्र, स्टीफन कोविड केअर सेंटर, ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना व डॉक्टर आरोग्य कर्मचारी यांना फळे, बिस्किट, ORS, सॅनिटायझर, मास्क, पाणी बाटली इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले.
सामाजिक उपक्रमात संस्था नेहमी अग्रेसर असून मागील वर्षीही मुख्यमंत्री सहायता निधीला रुपये एक लाखाचा धनादेश तहसिलदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला असल्याचे नौशाद मुल्ला यांनी सांगितले.
संभाव्य येणाऱ्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका विचारात घेऊन 50 बेडचे बालकांचे कोविड केअर सेंटर उभारण्याचा मानस असल्याचे मत चेअरमन प्रवीण वाटंगी व्यक्त केले. यासाठी लागणारी सर्व यंत्रणा उभारू पण सेवा देणारे बालरोग तज्ञ उपलब्ध होणे गरजेचे असून त्यांनी या ग्रामीण भागात सेवा द्यावी असे आवाहनही चेअरमन प्रवीण वाटंगी यांनी केले.
यावेळी नौशाद मुल्ला, हारून नाईकवाडी, इस्माईल मुल्ला, वसंत कोलकार, कृष्णा पाटील, महेश गावडे, नगरसेवक अभिजीत गुरबे, मोहन डोणकर, संभाजी देसाई इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Check Also
विषबाधेने दोन घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू; दोन सख्खे भाऊ अन् दोन सख्ख्या चिमुकल्यांचा अंत..
Spread the love कोल्हापूर जिल्ह्यातील घटना कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात विषबाधेच्या कारणामुळे दोन घटनांमध्ये पाच …