चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : गावोगावी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जीवाचा धोका पत्करुन तूटपूंज्या मानधनावर अथक परिश्रम घेत असणाऱ्या आशा सेविका यांना आज आमदार राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार राजेशदादा युवा मंच यांच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, माणगांव येथे सर्व आशा सेविका व आरोग्यसेविका यांना जीवनावश्यक रेशन धान्य किट वाटप करण्यात आले.
याप्रसंगी वाटप करतेवेळी प्राथमिक वैद्यकीय अधिकारी डॉ. पठाने, माजी पंचायत समिती सदस्य अनिल सुरुतकर, आमदार युवा मंचचे कार्यकर्ते सूरज पाटील, विनायक पाटील, प्रमोद पाटील, श्रीधर पाटील, सुमित पाटील, महेश पाटील, एस. एन. पाटील सर, रविंन्द्र पाटील व आदि प्रमुख कार्यकर्ते तसेच इतर डॉक्टर, आरोग्य सेविका तसेच इतर कर्मचारी वर्ग उपस्तिथ होते.