कोगनोळी : कोगनोळी तालुका निपाणी येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार तारीख 14 रोजी दुपारी उघडकीस आली.
अनिल राजगोंडा पाटील (वय वर्षे 63) राहणार कोगनोळी, तालुका निपाणी असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांच्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, अनिल पाटील हे सकाळी शेताकडे जाऊन येतो म्हणून घरातून बाहेर पडले. सुळकुड रोडवर त्यांच्या शेतामध्ये काम चालू होते. येथे काही वेळ थांबून शेताच्या खालच्या बाजूला जाऊन गळफासाने आत्महत्या केली.
शेतात व इतर काम करणार्या लोकांनी बराच वेळ झाला. म्हणून शोधाशोध केली. त्यावेळी अनिल पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. या आत्महत्या पाठीमागील नेमके कारण समजू शकले नाही.
घटनेची माहिती निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनला देण्यात आली. घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय बी. एस. तळवार व सहकारी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला.
मृतदेह निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
सदर घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलिसात झाली आहे.
अनिल पाटील हे कोगनोळी ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य होते.
त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुले, भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
