बेळगाव : कोरोनामुळे जनतेला ऑक्सिजनचे महत्त्व कळाले असून गेल्या वर्षभरात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत.
नैसर्गिकरित्या प्राणवायू तयार करण्यासाठी वृक्ष लागवड करणे अत्यंत गरजेचे असून दरवर्षी जायंट्सच्या माध्यमातून हे कार्य चालू असून ते अभिनंदनीय आहे, असे उदगार दुग्ध व्यावसायिक शरद पाटील यांनी काढले.
यावर्षी जायंट्स मेनच्यावतीने मार्कंडेय नगर येथे वृक्षारोपण करण्यात आले. त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कोविडसारख्या आजारातील विविध आव्हानाचा सामना व विशेषत: प्राणवायुचे महत्व अधोरेखित करुन बेळगावमध्ये वृक्षारोपण चळवळीला चालना देण्याच्या उद्देशाने वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
अध्यक्ष संजय पाटील यांनी सातत्याने आम्ही वृक्षलागवड करत असून आज लावण्यात आलेली आंबा, जांभूळ आणि फणसाची रोपे ही स्वतःच्या जायंट्स नर्सरीमध्ये तयार करण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी मार्कंडेय नगरमधील प्रतिष्ठित नागरिक अशोक पाटील, मार्केटयार्ड येथील व्यापारी सुरेश जाधव, मदन बामणे, जायंट्स नर्सरीचे सुनिल मुतगेकर, सचिव विजय बनसुर, खजिनदार लक्ष्मण शिंदे यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी मल्लिकार्जुन सत्तीगेरी, आनंद कुलकर्णी, नारायण किटवाडकर, दुर्गप्रसाद जोशी, अक्षय जाधव, अभय जाधव व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
Check Also
कॅपिटल वन एकांकिका वेळापत्रक जाहीर
Spread the love बेळगाव : 13 व्या भव्य एकांकिका स्पर्धा दि. 4 व 5 जाने. …