बेळगाव : विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे कणेरीमठात बनविण्यात आलेल्या काढ्याचे बेळगावात विविध ठिकाणी वितरण करण्यात आले. डीसीपी डॉ. विक्रम आमटे यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
कोरोना महामारी रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. याच दरम्यान, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारी विविध प्रकारची औषधे वाटण्याचा उपक्रम विविध सामाजिक संस्थांतर्फे सुरु आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे कणेरीमठाकडून बनविण्यात आलेल्या काढ्याचे बुधवारी बेळगावात विविध ठिकाणी वाटप करण्यात आले. डीसीपी डॉ. विक्रम आमटे यांनी या उपक्रमाला चालना दिली. यावेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे पदाधिकारी विशाल रामण्णावर, सुनील नायक, पंचाक्षरी बेल्लद, विजय तळवार, जिल्हाध्यक्ष श्रीकांत, सहकोषाध्यक्ष कृष्णाजी भट आदी उपस्थित होते.
Check Also
म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे बहरदार लावणी महोत्सव स्पर्धा संपन्न
Spread the love खानापूर : विद्यार्थिनींच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी अंगभूत कलागुण विकसित करण्यासाठी श्री …