खानापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या पहिल्याच पावसात गर्लगुंजीत (ता. खानापूर) गावातील शिवाजी नगरात गटारीचे पाणी घरात शिरल्याने तारांबळ उडाली.
गर्लगुंजी बेळगाव रस्त्यावरील शिवाजी नगरात रस्त्याचे काम करण्यात आले त्यामुळे गटारी मातीमुळे भरून गेल्या होत्या.
पहिल्याच पावसात रस्त्याचे पाणी गटारीचे पाणी वाढल्याने घरात पाणी साचले.
लागलीच ग्राम पंचायतीने जेसीबीच्या सहाय्याने गटारीतील गाळ, कचरा, माती बाजुला काढुन गटारीच्या पाण्याला वाट करून दिली. त्यामुळे घरात शिरणारे पाणी कमी झाले. त्यामुळे नागरिकांचा त्रास दुर झाला.
यावेळी ग्राम पंचायत अध्यक्षा, उपाध्यक्ष सर्व सदस्य ग्राम पंचायत पीडीओ व नागरिक उपस्थित होते.
Check Also
खानापूरात उद्या विसावे गुंफण सद्भावना साहित्य संमेलन; भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी
Spread the love खानापूर : शिवस्वराज जनकल्याण फाउंडेशन खानापूर व गुंफण साहित्य अकादमीतर्फे खानापूर येथील …