खानापूर (प्रतिनिधी) : सध्या खानापूरात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरातील रस्त्याची समस्या तसेच डुक्कराची समस्या येथील रहिवाशांना सतावत आहे.
मात्र खानापूर नगरपंचायत तसेच नगरसेवक झोपेचे सोंग घेऊन दिवस काढत आहेत.
कोणी म्हटले आहे की, झोपलेल्या जागे करता येईल, मात्र झोपचे सोंग घेतलेल्या नगरपंचायतीला जागे करणे महा कठीण झाले आहे. तेव्हा तालुक्याच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी तरी विद्यानगरातील समस्याची जाणीव करून घ्यावी. व रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी या भागातील जनतेतून होत आहे.
Check Also
कै. वामनराव मोदगेकर एस.एस.एल.सी. व्याख्यानमालेला सुरुवात
Spread the love बेळगाव : रणझुंझार शिक्षण संस्था निलजी संचालित रणझुंझार हायस्कूल निलजीमध्ये रणझुंझार शिक्षण …