बेळगाव : विश्व योग दिनानिमित्त भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळच्यावतीने बेळगाव ग्रामीण मंडळमध्ये उचगाव, कर्ले, के. के. कोप, तारिहाळ अशा 4 ठिकाणी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी बोलतांना भाजपा बेळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष श्री. संजय पाटील म्हणाले, योग ही आपल्या देशाची देणगी आहे. आज विदेशी डे आपण साजरे करतो. पण जिथ पिकतय तिथ खपत नाही असे म्हणतात पण आमचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. योगाचे महत्व लोकांना पटवून दिले पाहिजे.
याप्रसंगी भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले. मोदींच्या नेतृत्वाखाली त्यांच्या प्रयत्नामुळे आज संपूर्ण जग विश्व योग दिवस साजरा करत आहे. भारताने जागाला दिलेली मोठी देणगी आहे. याप्रसंगी के. के. कोप मठाचे स्वामीजी चेतन अंगडी, पतंजली योग पिठाचे सदस्य नारायण पाटील, बसवराज दमन्गी, पंकज घाडी, नरसिंग देसाई, पवन देसाई, प्रदीप पाटील, मनोहर कडोलकर, रामचंद्र मन्नोळकर, लिंगराज हिरेमठ आदींनी भाग घेतला..