बेळगाव : जिव्हाळा फाउंडेशनतर्फे नावगे येथील करुणालय वृद्धाश्रमात फादर्स डे साजरा करण्यात आला. यावेळी जिव्हाळा फाउंडेशनच्या वतीने वृद्धाश्रमातील सदस्यांना मिठाई आणि राशनचे वाटप करण्यात आले.
अनिता रॉड्रीक्स यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि करुणालय वृद्धाश्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. जिव्हाळा संस्थेच्या अध्यक्षा सौ. माधुरी जाधव आणि उपाध्यक्ष डॉ. राजश्री अनगोळ यांनी जिव्हाळा संस्थेबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. तसेच संस्थेच्या संस्थापिका डॉ. सविता कद्दु यांनी करुणालय वृद्धाश्रमास, सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच वृद्धाश्रमातील सर्व सदस्यांचे लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला.
यावेळी कोषाध्यक्षा सौ. ज्योती मिरजकर, सचिव आरती निपाणीकर, सहकोषाध्यक्षा सौ. योगिता पाटील, सहसचिव सौ. स्मिता शिंदे, सदस्य विनय पाटील, वृषभनाथ अवलक्की, श्रीनिवास गुडमनी, संतोष तलपसुर, शहाबाज जमादार व सौ. रेडकर उपस्थित होते.