समस्या त्वरित सोडवण्याचे आश्वासन
बेळगाव : आनंद नगर रहिवाशी संघटना आणि उत्कर्ष महिला मंडळावतीने आमदार अभय पाटील यांची भेट घेवून आनंद नगर परिसरातील नागरी समस्यांसंदर्भात चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात प्रामुख्याने नाल्यासंदर्भात समस्या मांडण्यात आली. आदर्श नगरपासून अन्नपूर्णेश्वर नगरपर्यंत वाहणाऱ्या नाल्यावर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे त्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते आणि सखल भागातील घरामध्ये शिरते तसेच परिसरातील विहिरींमध्ये ड्रेनेजचे पाणी शिरून पाणी दूषित होऊन रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदनाची तात्काळ दखल घेत आमदार अभय पाटील यांनी महानगरपालिका आयुक्त के. एच. जगदीश यांना तातडीने बोलावून घेऊन परिसराची पाहणी केली आणि लवकरात लवकर नाल्याची समस्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी आनंद नगर रहिवाशी संघटना तसेच उत्कर्ष महिला मंडळाचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक आणि महिला उपस्थित होत्या.
Check Also
कै. एम. डी. चौगुले व्याख्यानमालेस २९ डिसेंबरपासून सुरुवात
Spread the love बेळगाव : दरवर्षी मण्णूर येथील “कै. एम. डी. चौगुले सामाजिक आणि शैक्षणिक …