Tuesday , September 17 2024
Breaking News

विजय माल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला मोठा झटका! ९ हजारांपेक्षा जास्त संपत्ती बँकांकडे हस्तांतरित

Spread the love

नवी दिल्ली: देशातील अनेक बँकांना कोट्यवधींचा गंडा घालून देशाबाहेर पळून गेलेल्या उद्योजक विजय माल्या, हिरेव्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना मोठा झटका बसला आहे. कारण या तिघांच्याही हजारो कोटींची संपत्ती बँकांनी हस्तांतरित केली आहे.

विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या तिघांची मिळून तब्बल 9,371 कोटी रुपयांच्या मालमत्ता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये ट्रांसफर केल्या गेल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या फरार असलेल्या तीन्ही आरोपींच्या मालमत्तेद्वारे त्यांच्या फसवणूकीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणात ईडीने म्हटले आहे की, PMLA अंतर्गत विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी प्रकरणात केवळ 18,170.02 कोटी रुपयांची संपत्ती (बँकांना झालेल्या एकूण तोट्यापैकी 80.45%) जोडली गेली होती, परंतु तसेच 9371.17 कोटी रुपये कुर्क / जप्त मालमत्तेचा एक भाग PSB आणि केंद्र सरकारकडे ट्रांसफर करण्यात आला आहे. ED ने आतापर्यंत 18,170.02 कोटींची मालमत्ता कुर्क केली आहे, त्यातील सुमारे 80 टक्के रक्कमी एवढे बँकांचे नुकसान झाले आहे.

सध्या बंद असलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचा मालक विजय मल्ल्या याच्यावर ब्रिटनमध्ये भारतात प्रत्यार्पणासाठी तेथील कोर्टात खटला चालू आहे आणि सध्या तो जामिनावर सुटला आहे. सन 2019 मध्ये तत्कालीन यूकेच्या गृहसचिवांनी त्याच्या प्रत्यार्पणास मान्यता दिली.

तर दुसरीकडे, पंजाब नॅशनल बँकेकडून 13,500 कोटी रुपयांचे कर्ज फसवणूकीच्या प्रकरणात नीरव मोदी, मेहुल चोक्सी जानेवारी 2018 मध्ये भारत सोडून पळून गेले. चोक्सी सध्या डोमिनिकाच्या तुरूंगात आहेत तर मोदी ब्रिटनच्या तुरुंगात आहेत.

About Belgaum Varta

Check Also

गोमंतकीय कवी नवनाथ रामकृष्ण मुळवी यांना साहित्यज्योती काव्यलेखन पुरस्कार

Spread the love  रचना प्रकाशन साहित्य समूह आम्ही शब्दांचे शिलेदार आरमोरी गडचिरोली : ‘अज्ञानातून प्रकाशाकडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *